मुंबई

‘संगम’मधून ज्येष्ठांच्या कर्तृत्वाचा सन्मान

CD

बोईसर, ता. ६ (वार्ताहर) : ज्येष्ठ नागरिकांना सन्मान, आत्मीयता आणि गुणवत्तापूर्ण जीवनाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सामाजिक सेवा प्रभागातर्फे ‘संगम : गौरवपूर्ण वृद्धावस्था व सन्मानित जीवन’ कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता. ४) एमआयडीसीतील टीमा हॉल येथे करण्यात आले. कार्यक्रमास सुमारे २५० नागरिकांनी सहभाग घेतला.

शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व जमनालाल बजाज पुरस्कारप्राप्त रजनीकांतभाई श्रॉफ तसेच आनंद वृद्धाश्रमाच्या संचालिका मनीषा कोटक यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ज्येष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

नम्रता दीदी, हिरल दीदी आणि हेमा दीदी यांनी राजयोग ध्यान, योग, निरोगी जीवनशैली आणि सकारात्मक विचार याबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, ज्ञान व संस्कार ही समाजाची अमूल्य संपत्ती असून, नव्या पिढीने त्यांचा सन्मान राखावा, असा संदेश या वेळी देण्यात आला.

बी. के. गोपालभाई यांच्या भावपूर्ण संगीतमय सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बीके सिंहभाई, सुधीरभाई, मनीषा बहन आणि गोपालभाई यांनी योगदान दिले. शशांक मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले. विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, रोटरी क्लबचे सदस्य आणि बोईसरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नव्या पिढीने सन्मान राखावा
ज्येष्ठांना पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. राजयोग ध्यान, योग, निरोगी जीवनशैली आणि सकारात्मक विचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठांचे अनुभव, ज्ञान व संस्कार ही समाजाची अमूल्य संपत्ती असून, नव्या पिढीने त्यांचा सन्मान राखावा, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.

बाेईसर : टीमा हॉल येथे संगम साेहळ्याला ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT