मुंबई

कचऱ्याने गिळले अंतर्गत रस्ते

CD

अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
तारापूर एमआयडीसीतील पर्यायी मार्गांची दुरवस्था; कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

बोईसर, ता. १ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि कामगारांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेले अंतर्गत सिमेंट-काँक्रीटचे रस्ते सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहेत. एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पर्यायी मार्गांवर औद्योगिक कचरा, टाकाऊ साहित्य आणि लोखंडी तारांचे ढीग साचले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी तयार केलेले रस्ते कचरा साठवण्याचे ठिकाण बनल्याने कामगार आणि वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

औद्योगिक वसाहतीतील वाढती रहदारी लक्षात घेऊन कारखान्यांच्या मध्यभागातील मोकळ्या जागांमधून हे अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले होते. कामगारांना पायी चालण्यासाठी तसेच दुचाकी आणि लहान वाहनांच्या वाहतुकीसाठी हे मार्ग सोयीचे ठरत होते, मात्र नियमित देखभाल आणि स्वच्छतेअभावी या रस्त्यांवर औद्योगिक कचरा, लोखंडी तारा, वाळलेल्या फांद्या आणि टाकाऊ साहित्याचे ढीग साचले आहेत. अनेक महिन्यांपासून हा कचरा हटवण्यात आलेला नसल्याने रस्त्यांचा मोठा भाग अडवला गेला आहे. परिणामी, कामगारांना आणि वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

अंधारामुळे अपघातांचा धोका
या अंतर्गत मार्गांवर पथदिव्यांचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी परिसरात अंधार असतो. रस्त्यावर पडलेल्या लोखंडी तारा आणि कचऱ्याचे ढीग अंधारात दिसत नसल्याने दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही वाहनचालक घसरून पडत असल्याचेही सांगण्यात येत आहे. लाखो रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते देखभालीअभावी वापरण्यायोग्य राहिले नसल्याने निधी खर्चाचा उपयोग काय, असा सवाल कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.

एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी एमआयडीसी प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यांवरील कचरा आणि अडथळे हटवावेत. तसेच पथदिव्यांची व्यवस्था करून हे मार्ग पुन्हा सुरळीत वाहतुकीसाठी खुले करावेत, अशी मागणी कामगार आणि वाहनचालकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

Vadgaon Anand Bypass Theft News : पुणे-नाशिक महामार्गावर ६६ वर्षीय वृद्धाला बोलण्यात गुंतवून २ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले; आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

Latest Marathi News Update : ऊस दराचा प्रश्न पेटला! शेतकरी संघटना आणि विठ्ठल कारखान्याचे समर्थकांकडून महामार्गावर रास्ता रोको

Spiritual Leadership: राजयोगी ब्रह्माकुमार दशरथभाई भागवत यांना राष्ट्रीय अध्यात्म नेतृत्व पुरस्काराने सन्मानित

SCROLL FOR NEXT