मुंबई

खारघरमध्ये गणेश आगमन मिरवणुकीत मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक; दोघांवर पोलिसांची कारवाई विना परवानगी ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याप्रकरणी समजपत्र; १५ सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

CD

खारघरमध्ये ध्वनिक्षेपकप्रकरणी दोघांवर पोलिसांची कारवाई
खारघर, ता. १३ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिक्षेपकाचा मर्यादित वापर, सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी खारघर पोलिसांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तरीही, विनापरवानगी व तीव्र आवाजात ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याप्रकरणी खारघर सेक्टर २० येथील ‘रहिवासी विकास मंडळा’च्या दोन पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील गणेश मंडळांमध्ये खळबळ उडाली आहे.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जोशी यांनी खारघर परिसरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवण्यासह नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र
शनिवारी (ता. १२) रात्री १०.१५ वाजता खारघर सेक्टर १२ येथील शिल्प चौक परिसरातून गणेश आगमन मिरवणुकीत मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच, ध्वनिक्षेपकासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचेही पोलिसांच्या कारवाईत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मंडळाशी संबंधित संजयराव चोरे (वय ६२) आणि अक्षय भोसले (३०) यांच्यावर खारघर पोलिसांनी कारवाई करून समजपत्र बजावले आहे. संबंधितांना मंगळवारी (ता. १५) प्रथमवर्ग न्यायालय, पनवेल येथे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. गणेशोत्सव काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने ध्वनिक्षेपकाचा मोठा आवाज, मिरवणुकीतील शिस्त आणि सार्वजनिक शांतता याबाबत पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून उत्सव शांततेत पार पाडावा. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- संजय जोशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खारघर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली! कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प, ४५ मिनिटं प्रवाशांचा खोळंबा

Baramati Lok Adalat : बारामती लोकअदालतीत ५६२७ प्रकरणे निकाली; साडेसहा कोटींची वसुली

Baramati Crime News: बारामतीतील पणदरे गावात विवाहित महिलेचा गळा आवळून खून; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT