मुंबई

खारघर, तळोज्यात गणेश विसर्जनासाठी १२ गणेश घाट, ३२ कृत्रिम तलावांची सुविधा पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन; पनवेल महापालिकेची तयारी पूर्ण

CD

खारघर, तळोज्यात गणेश विसर्जनासाठी १२ गणेश घाट, ३२ कृत्रिम तलावांची सुविधा
पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन; पनवेल महापालिकेची तयारी पूर्ण
खारघर , ता. १५ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी पनवेल पालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. प्रभाग समिती ब अंतर्गत खारघर आणि तळोजा परिसरात १२ नैसर्गिक विसर्जन घाट आणि ३२ कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तळोजा फेज-१ येथील पेठाली गाव गणेश घाट, भोईरपाडा गणेश घाट, पापडीचा पाडा गणेश घाट, पेठ गाव गणेश घाट, खुटुकबांधण सेक्टर-२५ गणेश घाट, रांजणपाडा गाव गणेश घाट आणि तळोजा पाचनंद गणेश घाट यांचा समावेश आहे. तसेच, खारघर परिसरात खारघर गाव, मुर्बी गाव, बेलपाडा, कोपरा गाव खाडी सेक्टर-१० आणि कोपरा तलाव सेक्टर-१५ येथे गणेश विसर्जन घाट निश्चित केले आहेत.
यासोबतच गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन व्हावे, यासाठी विविध सेक्टर तसेच सोसायट्यांच्या परिसरात ३२ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. तळोजा फेज-१ व २, साई मध्य सोसायटी सेक्टर-३४, सीआयएसएफ स्मोअर मैदान सेक्टर-३०, हाईड पार्क सोसायटी सेक्टर-३५, प्रशांत कॉर्नर, ओवे कॅम्प गाव, राजणपाडा, सेक्टर-३६, बागेश्री सोसायटी परिसर आदी ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात आले आहेत.

३२ कृत्रिम तलावांची सुविधा
खारघरमधील सेक्टर-११, १४, २०, २१, २२, २३, २४, २८, २९ तसेच मुर्बी गाव तलावाजवळ, गावदेवी मैदान आणि इतर ठिकाणीही कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. या व्यवस्थेमुळे नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यास मदत होणार असून, लहान गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास नागरिकांना प्रोत्साहन मिळणार आहे. शक्यतो कृत्रिम तलावांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT