मुंबई

शिवमंदिरात महापूजा, काकडआरती

CD

खोपोली, ता. १८ (बातमीदार) ः खोपोलीचे ग्रामदैवत व पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मध्यरात्री साडे बारा वाजता शिवलिंगाची महापूजा व पहाटे पाच वाजता काकडआरती करून खोपोलीतील भगवान वीरेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त आजूबाजूच्या गावातील पालख्या वीरेश्वर मंदिरात दाखल झाल्या होत्या. खोपोलीत बाजारपेठेला लागून असलेले पुरातन भैरवनाथ मंदिर, भानवज-मोगलवाडी येथील भव्य बारा जोतिर्लिंग शंकर मंदिर, शिळफाटा येथील ऐतिहासिक शंकर मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी होती. पोलिसांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्‍त ठेवला होता.

................

पोलादपूरामध्ये टेकडीवर शिवभक्तांचे श्रद्धास्थान
पोलादपूर (बातमीदार) ः पोलादपूरातील निसर्गरम्य गिरी शिखरावरील ‘महादेवाचा डोंगर’ देवस्थान अखंड शिवभक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. शनिवारी सकाळी भाविकांनी स्वयंभू श्री शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले. या वेळी महाआरती व विधिवत पूजा करण्यात आली. पोलादपूरातील शिवभक्तांनी महादेव डोंगर येथे पाऊलवाट साफसफाई, पाऊलवाटेच्या कडेने झाडांचे संगोपन, परिसराची स्वच्छता रंगरंगोटी व सुशोभीकरण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT