मुंबई

नेत्यांचा अपमान करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ

CD

खोपोली, ता. १० (बातमीदार) ः आमदार महेंद्र थोरवे यांनी माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आमदार अदिती तटकरे यांचा विरोधात अपमानकारक वक्‍तव्य केल्‍याचे तीव्र पडसाद कर्जत, खालापूर व खोपोलीत उमटले आहे. त्या संदर्भात खालापूर येथे रविवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे यांनी आमदार थोरवे यांच्यावर टीका करीत थोरवे यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. या प्रकरणी आमदार थोरवे यांनी तत्काळ माफी न मागितल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा पिंगळे यांनी दिला. यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, कर्जत मतदार संघ अध्यक्ष ॲड संतोष बैलमारे, खोपोली तालुका अध्यक्ष मनेश यादव, तालुका महिला अध्यक्ष श्वेता मनवे, खोपोली शहर महिला अध्यक्ष सुवर्णा मोरे, माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खोपोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला.
...............

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून थोरवेंची पाठराखण

नेरळ, ता. १० (बातमीदार) ः अदिती तटकरे यांचा अवमान झालेला नाही, बोली भाषेतील प्रचलित शब्‍द असून वडीलधारी मंडळी लहान मुलांसाठी सहज वापरतात. अदिती तटकरे या आपल्या भगिनी आहेत, त्यांचा कायम आदर करू. राष्ट्रवादीतील काही पदाधिकारी आपल्या नेत्यांना खूष करण्यासाठी राजकारण करीत असल्‍याची टीका शिवसेनेचे विधानसभा संघटक शिवराम बदे यांनी केली आहे. कर्जत येथे पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, ज्‍येष्ठ नेते संतोष भोईर, विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी जगताप, उपतालुकाप्रमुख अंकुश दाभने, दिलीप ताम्हाणे आदी उपस्थित होते.
,---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT