मुंबई

शरीरसौष्‍ठव स्‍पर्धेत उदय देवरेची बाजी

CD

खोपोली, ता. २ (बातमीदार) ः खोपोली शहर शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना आणि अंगीकृत संघटनेच्या वतीने नुकतीच आमदार श्री शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केली होती. एकूण ९१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत नागोठणे येथील स्पर्धक उदय देवरे यांनी मानाचा असा आमदार श्री २०२३ चा किताब पटकावला.
स्‍पर्धेचे उद्‌घाटन सेनेचे संपर्क प्रमुख विजय पाटील यांचे हस्ते झाले. रायगड जिल्हा व खोपोली शहर बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सौजन्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानात स्पर्धा घेण्यात आली. आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पर्धेला आपली उपस्थिती लावली होती.
दुसऱ्या स्थानी विशाल सावंत, बेस्ट पोझर म्हणून अरुण भोईर, श्रीकांत भोईर यांना पारितोषिक देण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेना खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, युवासेना शहर अधिकारी संतोष मालकर, शहर संपर्क प्रमुख राजू गायकवाड, संघटक संघटक तात्या रिठे, शहर समन्वयक हरेश काळे, युवा सेनेचे सिद्धांत शेलार, अविनाश किरवे, विवेक पाटील आदींनी प्रयत्‍न केले.

खोपोली : आमदार श्री शरीर सौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT