मुंबई

जिल्‍ह्यात आपची स्‍वराज्‍य यात्रा

CD

खोपोली, ता. ३१ (बातमीदार) ः आम आदमी पक्ष महाराष्ट्रसह प्रभारी गोपाल इटालिया यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा २८ मे रोजी पंढरपूर येथून विठोबाचे दर्शन घेऊन सुरू झाली आहे. १० दिवसांत ७८२ किलोमीटरचा पल्ला गाठून ६ जून २०२३ रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष असल्याचे औचित्य साधून रायगड किल्ल्यावर ही यात्रा पोहोचणार आहे.
यात्रा पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, दौंड, बारामती, फलटण, विटा, तासगाव, पलूस, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, पिंपरी-चिंचवडमार्गे ४ जून सकाळी दहाच्या दरम्यान खोपोलीत पोहोचेल. त्‍यानंतर नवी मुंबई, ठाणे, पनवेलमार्गे पेण, कोलाड, माणगाव, महाड ते पाचाडपर्यंत प्रवास करेल. ६ जून रोजी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येईल.
आम आदमी पक्षाला जनसामान्यांमध्ये पोहोचवणे, जनाधार तयार करणे, नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणे, जनजागृती करणे, हा यात्रेचा उद्देश असल्‍याचे जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी डॉ. रियाज पठाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये काही भागात पावसाचे आगमन

Amethi Gulgula : केकच्या युगातही कायम आहे अमेठीच्या 'गुलगुला'ची क्रेझ! पाहा साध्या गव्हाच्या पिठापासून कशी बनते ही पारंपरिक मिठाई

SCROLL FOR NEXT