मुंबई

भाजपाच्या ‘हरघर संपर्क’ अभियानाला वावोशी येथे प्रारंभ

CD

खोपोली, ता.१० (बातमीदार) : भारतीय जनता पक्षाच्या सरकारला केंद्रात नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात हर घर संपर्क अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तालुक्यात या अभियानाचा प्रारंभ वावोशी येथून विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, तालुका चिटणीस शशिकांत मोरे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नागेश पाटील, तालुका कामगार आघाडी अध्यक्ष रवींद्र पाटील, रवींद्र मोरे, मोहन घाडगे, संदीप मोरे, महेश कडू, प्रणित रोनी इत्यादी सह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीचा आलेख उपस्थित ग्रामस्थांसमोर मांडला. जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर योजना या अभियानाचा खालापुर तालुक्यातील महिलांना लाभ मिळावा, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असून या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा, तसेच ही योजना घरोघरी राबवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सोलापूरसाठी मोठी भेट! शर्तभंग झालेल्या ‘या’ जागा होणार वर्ग-१; एका शासन निर्णयात १०० वर्षांपूर्वीचा प्रश्न मिटला, वाचा...

व्यापारी जहाजावर रशियन क्षेपणास्त्राचा भीषण हल्ला; चार भारतीय खलाशांचा मृत्यू, भारताकडून संताप

Pune News : शिफारशीच्या भरतीमुळे सुरक्षा यंत्रणा 'कमकुवत'; महापालिका आयुक्तांच्या उत्तराने नगरसेवकांची कोंडी

AC Local Close : हार्बर मार्गावरील सात एसी लोकल फेऱ्या रद्द! तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांना

Pali News : सुधागड तालुक्यातील कोशिंबळे धबधब्याच्या डोहात स्थानिक नागरिक बुडाला

SCROLL FOR NEXT