शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
खोपोली, ता. २८ (बातमीदार) ः खालापूर तालुक्यातील चिलठण, उसरोली, भोकरपाडा, स्वाली येथील शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. खालापूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सात ठिकाणी राष्ट्रवादीचे सरपंच तर आघाडीच्या माध्यमातून तीन ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. निवडणुकीत दिलेला शब्द पाळणार असून प्रस्तावित धरणाचे काम खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून मार्गी लावू, असे आश्वासन यावेळी युवक जिल्हाध्यक्ष साखरे यांनी दिले. ग्रामीण भागातील विकासावर भर देणार असल्याचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनी सांगितले.
खोपोली : शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.