मुंबई

वादळी पावसामुळे इमारत कोसळली

CD

खोपोली, ता. १५ (बातमीदार)ः खोपोली नगरपालिका क्षेत्र व परिसरात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट, जोरदार वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला. यामुळे अनेक घरांचे, वीजभट्टी, फळबागांचे मोठे नुकसान झाले. लौजी गावातील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यावेळी झालेला मोठा आवाज, उडालेल्‍या धुळीच्या लोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. इमारत अनेक वर्षांपासून बंद होती, त्‍यामुळे जीवितहानी टळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, अग्निशमन दल तसेच महावितरणच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
लौजी येथील सर्वे नंबर २ मध्ये जागामालक अशोक भारती यांनी चेंबूरचे विकसक गणेश माने यांना जागा इमारत बांधणीसाठी दिली आहे. ही इमारत २०१० च्या दरम्यान तयार झाली. दरम्यान इमारत बांधकामावरून जागामालक व विकसकात वाद सुरू असल्‍याचे समोर येत आहे. इमारतीचे बांधकाम सदोष असल्‍याचे तक्रारही जागामालक भारती यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर इमारत धोकादायक असल्याचे पत्र ४ एप्रिल २०२४ ला मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी, जागामालक व विकसन यांना दिले व त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. मात्र जागामालक व विकसक यांनी संबंधित पत्राकडे दुर्लक्ष केल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळ सुरू असतानाच मंगळवारी पहाटे कोसळली आहे. सुदैवाने दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही अथवा शेजारील इमारतीमधील रहिवाशांच्या वाहनांचेही नुकसान झालेले नाही. मात्र या दुर्घटनेत लगतच्या इमारतीची सुरक्षा भिंत कोसळल्‍याचे दिसून आले.
तहसीलदार आयुब तांबोळी यांनी या घटनेबाबत माहिती घेतली तर मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी बांधकाम अभियंत्‍यासह घटनास्थळी पाहणी केली. दुर्घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली. महावितरण विभागाने पडलेल्या खांबांवरील वीजप्रवाह काही काळ खंडित केला होता. नगरपरिषद प्रशासनाने रस्त्यावर पडलेला इमारतीचा मलबा तातडीने बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.


लौजी गावात तीन मजली इमारत दुर्घटनेची चौकशी नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बांधकामात त्रुटी असल्‍याचे यापूर्वीही सांगण्यात आले होते. त्‍यानुसार संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- पंकज पाटील, मुख्याधिकारी, खोपोली

खोपोली : लौजी गावात तीन मजली इमारत कोसळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT