मुंबई

एक्स्प्रेस वेवर बसला अपघात

CD

एक्स्प्रेस वेवर बसला अपघात
पाच प्रवासी जखमी; दोन गंभीर

खोपोली, ता. ७ (बातमीदार) ः पुणे येथून ठाण्याला एक्स्प्रेस वेमार्गे निघालेल्या एसटी महामंडळाच्या प्रवासी बसला खोपोली हद्दीत अपघात झाला. गुरुवारी रात्री साधारण दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. अपघातात पाच प्रवासी जखमी झाले असून यातील दोघे गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. पाचही जखमींना तातडीने एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ही बस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीतून एक्स्प्रेस वेने जात असताना आडोशी उतारावर बस अनियंत्रित होऊन बसने पुढील कंटेनरला जोरदार धडक दिली. यात बसमधील ३० पैकी पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन पुरुष, एक महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. यातील दोघे पनवेल व तीन जण ठाणे परिसरातील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती होताच सर्व आपत्कालीन यंत्रणा, वाहतूक पोलिस, खोपोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने मदतकार्य करून प्रथम जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी दाखल करण्याची कामगिरी बजावली. त्यानंतर अपघातग्रस्त बस एका बाजूला आणून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची खोपोली पोलिसात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.
...
जखमींची नावे
विनिद गोरे (वय ५६), रामचंद्र बाबर (वय ५४), सुजाता खडतरे (वय ५८), प्रीतम पाटील (वय २८) व एक मुलगा (नाव समजले नाही)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT