मुंबई

कर्जतमध्ये पार्किंगचा बोजवारा

CD

कर्जतमध्ये पार्किंगचा बोजवारा
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी; चारचाकी वाहने उभी करण्यास जागेचा अभाव
कर्जत, ता. ९ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी कर्जत शहरात सोमवारपासून नागरिकांची मोठी गर्दी वाढली आहे, मात्र शहरात पुरेशा पार्किंगची व्यवस्था नसल्याने चारचाकी वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नाही. बाजारपेठेतील गर्दी आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून, ‘नगर परिषद नेमके काय करत आहे,’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला स्थानिक नागरिकांची वाहने दिवसभर उभी राहत असल्याने बाहेरील भागातून तसेच तालुक्यातील विविध गावांतून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पोलिस आणि नगरपरिषदेकडून बेशिस्त वाहनांवर कारवाई केली जात असली, तरी पर्यायी पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने मूळ समस्या कायम आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी, हातगाड्या व रिक्षांचे नियोजन तसेच प्रभावी नो-एन्ट्री व्यवस्था करण्याची गरज आहे.

पार्किंगसाठी तात्पुरत्या जागांची गरज
स्थानिक चारचाकी वाहने आमराई मैदानात हलवावीत. बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी पोलिस मैदान, नदीकाठ तसेच श्री शनी मंदिर रोड परिसरात तात्पुरती पार्किंग व्यवस्था करावी. गर्दीच्या काळात बाजारपेठेत मोठ्या वाहनांचा प्रवेश रोखून हातगाड्या आणि रिक्षांचे स्वतंत्र नियोजन करावे, अशी सूचना शहर बचाव समितीने केली आहे. सणासुदीच्या काळात पोलिस आणि नगर परिषद प्रशासनाने संयुक्त नियोजन करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया
कर्जत शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने समन्वयाने हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांसाठी कायमस्वरूपी पार्किंगची सुविधा गरजेची आहे. तालुक्यातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठीही पार्किंगची सोय असावी. केवळ दंडात्मक कारवाई करून प्रश्न सुटणार नाही; त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
– रंजन दातार, कर्जत शहर बचाव समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A Squad: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार हार्दिक पांड्या; ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय अ संघ जाहीर

DK Shivakumar: मंत्र्यावर EDची रेड पडताच मुख्यमंत्री डीके शिवकुमार संतापले; म्हणाले, आता आम्ही घाबरणार नाही...

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

SCROLL FOR NEXT