मुंबई

कर्जतच्या रस्त्यांची दुरवस्था

CD

कर्जतच्या रस्त्यांची दुरवस्था
पर्यटननगरीतील प्रमुख मार्गांसह ग्रामीण रस्त्यांची अवस्था खराब; नागरिक, पर्यटक त्रस्त
कर्जत, ता. ४ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका निसर्ग, रिसॉर्ट, फार्महाउस आणि माथेरानमुळे प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. तालुक्यात सुमारे सात हजार छोटे-मोठे रिसॉर्ट व फार्महाउस असून, वर्षभर हजारो पर्यटक येतात, मात्र पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याने नागरिक आणि पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अडीच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या कर्जत तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. तरीही काही महिन्यांतच रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने निकृष्ट कामांमुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत.

प्रमुख मार्गांची दुरवस्था
कर्जत-चौक मार्गाचे काँक्रीटीकरण दोन वर्षांपासून सुरू असून, अनेक ठिकाणी चढ-उतार, असमतल पृष्ठभाग आणि अपुरी साईडपट्टी असल्याची तक्रार आहे. मुरबाड-कर्जत-खोपोलीला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ५४८/अही अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने पाच ते सात ठिकाणी रस्ता अरुंद राहिला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या १० वर्षांत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.

उल्हास नदीवरील नवीन श्रीराम पूल ४ जुलै २०२६ रोजी वाहतुकीसाठी सुरू झाला, मात्र काही महिन्यांतच त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. कर्जत-नेरळ राज्य मार्ग ७९ वरही खड्डे, अपुरी साईडपट्टी आणि अरुंद भागांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

ग्रामीण मार्गांकडेही दुर्लक्ष
२०२ गावे आणि ५५ ग्रामपंचायती असलेल्या तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची पावसाळ्यानंतर पुन्हा दुरवस्था होते. पर्यटननगरी कर्जतला सुरक्षित, दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते कधी मिळणार, असा प्रश्न नागरिक प्रशासनासमोर उपस्थित करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT