मुंबई

शाळेच्या बसची कोंडी

CD

शाळेच्या बसची कोंडी
अरुंद बाजारपेठेत मोठ्या बसचा शिरकाव; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
कर्जत, ता. १३ (बातमीदार) : कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठ आणि महावीर पेठ परिसरात सहा चाकी स्कूल बसमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. अरुंद रस्ते, अवघड वळणे आणि जड वाहनांना प्रवेशबंदी असल्याचे सांगितले जात असतानाही मोठ्या बस बाजारपेठेतून जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नगर परिषदेचा कोपरा, मुख्य बाजारपेठ आणि महावीर पेठेतील अरुंद वळणांवर मोठ्या बस वळवताना अडचणी येतात. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून २० ते ३० मिनिटे वाहतूक ठप्प होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. बसमधून उतरणारी मुले थेट रस्त्यावर येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. वाहतूक कोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या बसचालकांना रस्त्याच्या कडेला बस उभी करू नये, अशा सूचना दिल्यानंतरही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे. बस अशाच पद्धतीने चालणार, असे उर्मट उत्तर चालकांनी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि प्रशासनाच्या नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरटीओ तपासणीची गरज
कर्जत बाजारपेठ आणि महावीर पेठ परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिस आणि नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्कूल बसच्या मार्गांचे नियोजन करून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी उतरवण्याची व्यवस्था करावी. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संबंधित बसची तपासणी करून आवश्यक कागदपत्रे, परवाने, वाहनांची स्थिती आणि सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याची खातरजमा करावी. प्रवेशबंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास नागरिकांची गैरसोय कमी होण्यासोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षितताही सुनिश्चित करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges: PhonePe, Google Pay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; MDR शुल्कांबाबत मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27 : गड आला, पण...! मुंबईने डावाने विजयासह बोनस गुण कमावला, मात्र आयुष म्हात्रे ६ आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला; नेमकं काय घडलं?

संतूर मॉम! रश्मी अनपट आहे आठ वर्षाच्या मुलाची आई; शेअर केले खास फोटो; नेटकरी म्हणाले- याची बायको आली की तू...

४८० सुपर मार्केटमध्ये सायबर हल्ला, फ्रीज आणि फ्रिजरचं तापमान ५० अंशावर, अनेक ठिकाणी लागली आग

Latest Marathi News Live Update : शंकर खंडू पाटील जन्मशताब्दी शासनातर्फे साजरी होणार

SCROLL FOR NEXT