मुंबई

अत्याचार करून बालिकेचा खून करणारा चकमकीत ठार

CD

बंगळूर, ता. १३ : हुबळीतील अध्यापक नगरमध्ये पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून अत्याचारानंतर तिचा खून करणारा संशयित पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. रक्षित क्रांती (मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. रविवारी सकाळी घडलेल्या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी रक्षित याचा शोध घेतला. मात्र, त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी झाडलेल्या गोळ्या त्याच्या पायात आणि छातीत घुसल्या. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. पीडित मुलीचे पालक कोप्पळचे आहेत. ते रंगकामासाठी हुबळी येथे आले होते. रविवारी मुलीचे वडील कामावर गेले असताना ही घटना घडली. मुलीची आई घरात काम करत होती आणि मुलगी बाहेर खेळत होती. यावेळी रक्षित क्रांतीने मुलीला चॉकलेट देण्याचे नाटक करून तिचे अपहरण केले. जेव्हा आईला कळले की, तिची मुलगी बेपत्ता आहे, तेव्हा तिने स्थानिक लोकांसोबत तिचा शोध सुरू केला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मुलीचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वापरात नसलेल्या शौचालयात आढळला. मृतदेह सापडल्यानंतर लगेचच स्थानिकांनी, विशेषतः महिलांनी अशोकनगर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करीत पोलिसांचा निषेध केला. शहर पोलिस आयुक्त एन. शशी कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्टेशनला भेट दिली आणि नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताच्या हालचाली कैद झाल्या आहेत. त्याआधारे रक्षित याची ओळख पटली. त्यावर अत्याचार आणि हत्येचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तथापि, वैद्यकीय तपासणीनंतरच अत्याचाराची पुष्टी होऊ शकते. मुलीचा मृतदेह हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवण्यात आला. दरम्यान, ही घटना गांभीर्याने घेत हुबळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली होती. तपास सुरू करणाऱ्या पोलिसांनी आरोपी रक्षित क्रांतीचे ठिकाण शोधले. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी हालचाल केली, त्यावेळी रक्षितने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. पोलिसांनी झाडलेल्या गोळ्या आरोपीच्या पायात आणि छातीत घुसल्या व तो जागीच कोसळला. पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि उपचार दिले; पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT