मुंबई

मुंबई गोवा महामार्गावर रसायनवाहू टँकर कलंडल्याने महामार्ग तीन तास ठप्प

CD

महाड, ता.३ (बातमीदार) : महाड एमआयडीसीमध्ये रसायन घेऊन येणारा टँकर कलंडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. महामार्ग वाहतूक पोलिस आणि महाड शहर पोलिस यांच्या प्रयत्नानंतर महामार्ग सुरळीत करण्यात आला. शुक्रवारी (ता.३) सकाळी १० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

तारापूर एमआयडीसीमधील लुपिन लिमिटेड या कंपनीतून महाड येथे जेट इन्सुलेशन प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यासाठी ऑरगॅनिक सोलव्हेन्ट घेऊन येणारा टँकर (क्रमांक एमएच ०४ बी जी ८१३) दासगाव गाव हद्दीत एका वळणावर आला असताना अचानक कलंडला. या घटनेनंतर महामार्ग वाहतूक पोलिस शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण धडे, सहायक फौजदार गणेश भिलारे, हवालदार नंदन निजामपूरकर, अजय मोहित, सुनील पाटील आणि महाड शहर पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक बंद केली. तसेच महाड औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दल, तसेच सुरक्षा अधिकारी चंद्रकांत देशमुख, शीतल पाटील व रोहन पाटील यांना पाचारण करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेत भरलेला टँकर सुरक्षित बाजूला करत तीन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली.
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT