मुंबई

वीरेश्वर महाराज छबिनोत्सवाची जय्यत तयारी

CD

महाड, ता. १५ (बातमीदार) : महाडचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव लवकरच सुरू होणार आहे. उत्सव शांततेत आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही महाडच्या प्रांताधिकारी प्रतिभा पुदलवाड यांनी दिली.
वीरेश्वर देवस्थान पंच कमिटी, स्थानिक प्रशासन यांची संयुक्त बैठक नुकतीच महाड प्रांताधिकारी पुदलवाड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. याप्रसंगी महाडचे तहसीलदार सुरेश काशीद, पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, नायब तहसीलदार सुरेश खोपकर, देवस्थान पंचकमिटीचे सरपंच दीपक वारंगे, उपसरपंच रमेश नातेकर, विश्वस्त अनंत शेठ, गणेश वडके, संजय पवार त्याचबरोबर उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शिंदे, उपाध्यक्ष गजानन काप व इतर उपस्थित होते.
वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल. पंच कमिटीने देखील उत्सव योजनाबद्ध साजरा करण्यासाठी योग्य नियोजन करावे तसेच भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुदलवाड यांनी केले. तहसीलदार सुरेश काशीद यांनी देखील प्रशासनाच्या भूमिकेची सविस्तर माहिती दिली. प्रशासनाकडून पंच समितीला काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्‍या आहेत.

महाशिवरात्रीचा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यात्रेमध्ये पाळणे, चक्र इत्यादी खेळ लावताना योग्य काळजी घेणे आवश्यक असून पाळणे लावण्यापूर्वी त्याची तपासणी करावी आणि नंतरच पंच समितीने परवानगी द्यावी, तसेच दुकानदारांना वीज पुरवठा करण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्यावी. याकरिता एमएसईबी यांचा ना हरकत दाखला घेण्यात यावा. दुकानदारांनी वाळूच्या बादल्या, अग्‍निरोधक यंत्रणा तत्पर ठेवावी.
- सुरेश काशीद, तहसीलदार


महाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT