मुंबई

विहीर खचल्याने इमारतीला धोका

CD

महाड, ता. ११ (बातमीदार) : सावित्री नदीकिनारी असणाऱ्या इमारतीच्या शेजारी असलेली विहीर आज (ता. ११) सायंकाळी अचानक कोसळली. या विहिरीलगत इमारतीचे कॉलम असल्याने बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रहिवाशांना इमारतीबाहेर काढण्यात आले आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून या ठिकाणी तपासणी केली जात आहे.

सावित्री नदीकिनारी बांधण्यात आलेल्या शिवम अपार्टमेंटच्या डी विंगशेजारी असलेली विहीर आज सायंकाळी अचानक खचली. त्यामुळे इमारतीच्या बांधकामाचे कॉलम पूर्णपणे उघडे पडले आहेत. यामुळे इमारत कोसळण्याच्या भीतीने नागरिकांनी तत्काळ ही घटना नगरपरिषदेला कळवताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीचा ताबा घेतला. या इमारतीमधील १८ सदनिकाधारकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन नगरपालिकेने केले. तीन वर्षांपूर्वी महाडमधील तारिक गार्डन ही इमारत कोसळल्याने १६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रहिवाशांच्या विरोधानंतरही बांधकाम?
शिवम अपार्टमेंटच्या शेजारील या विहिरीवर नुकतेच कठड्याचे बांधकाम केले गेले होते. हे कठड्याचे काम करताना इतर विंगमधील रहिवाशांनी विरोध दर्शवला होता. मात्र हे काम केल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.

इमारतीमधील १८ सदनिकाधारकांना घटनेनंतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
- महादेव रोडगे, मुख्याधिकारी, महाड नगर परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: कन्हैय्या कुमार यांचा धर्मांतर करा असे सांगणारा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल, वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT