मुंबई

टाईम टेक्नोप्लास्ट उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

CD

महाड, ता. २९ (बातमीदार) : महाड एमआयडीसीतील टाईम टेक्नो प्लास्ट कंपनीविरोधात कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला तिसरा दिवस उलटूनही कंपनी व्यवस्थापक कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नसल्याने शनिवारी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली.

कंत्राटी कामगारांना कामावर पुन्हा घेणे, पगारवाढ, कामगारांना सुरक्षा साधने पुरविणे अशा मागण्यांसाठी कंपनीच्या कामगारांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही कोणताही तोडगा न निघाल्याने उपोषणकर्त्यांपैकी आठ जणांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे कंपनी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
घटनास्थळी पोलिस प्रशासन व डॉक्टर पोहोचले असून, काही कामगारांना अधिक उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुटणार नाही, असा ठाम निर्धार उपोषणकर्त्या कामगारांनी घेतला. याबाबत कंपनी व्यवस्थापनाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

SCROLL FOR NEXT