मुंबई

छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना

CD

सुनील पाटकर, महाड
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकदिनाचे यंदा ३५० वे वर्ष असल्‍याने राज्य सरकारकडून किल्‍ले रायगडावर भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाडमधील निरंजन यादव या तरुणांनी शिवराज्याभिषेकदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर ते महाड असा ३५० किलोमीटर प्रवास २१ तास ४० मिनिटांत पूर्ण करून छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना दिली.
शिवराज्‍याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाराजांना अनोखी मानवंदना द्यावी, अशी कल्पना सायकलपटू निरंजनच्या मनात आली होती आणि त्याने साडेतीनशे किलोमीटर सायकल प्रवास करत शिवरायांना मानवंदना देण्याचा निर्णय घेतला. अखेर छत्रपती संभाजीनगर ते महाड असे अचूक साडेतीनशे किलोमीटर अंतर निश्‍चित करण्यात आले. या सायकल प्रवासासाठी त्‍याला पुण्यातील सायकल व्यावसायिक आनंद वांजपे यांचे मार्गदर्शन लाभले. त्‍यानुसार निरंजनने सायकल प्रवासाचा सराव सुरू केला. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी व्यायामावर भर दिला. दररोज २०० बैठकाही मारू लागला. त्‍यानंतर महाबळेश्वर ते महाड व महाड ते अलिबाग असा सायकल प्रवास केला. त्‍याच जोरावर संभाजीनगर ते महाड असा ३५० किलोमीटरचा सायकल प्रवास २१ तास ४० मिनिटात पूर्ण केला.
मित्र स्वस्तिक खैरकरसह २६ मे ला गाडीत सायकल टाकून निरंजनने संभाजीनगर गाठले. २७ मे ला पहाटे ३ वाजता महाराजांना वंदन करून त्यांने सायकल प्रवासाला सुरुवात केली. संभाजीनगरहून पहिल्या टप्प्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत ११० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. थोडीशी विश्रांती घेऊन दुपारी तीन वाजता पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये १७० किलोमीटरचे अंतर पार करून रांजणगाव गाठले. रांजणगाव येथून त्यांनी मध्यरात्री पुढील प्रवासाला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पुण्याजवळील मुळशी येथे विश्रांती घेतली. त्‍यानंतर अंतिम टप्प्यातील सायकल प्रवासाला सुरुवात केली. महाडपर्यंत साडेतीनशे किलोमीटरचा सायकल प्रवास २१ तास ४० मिनिटात पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराजांना आगळी वेगळी मानवंदना दिली. महाड येथे पोहोचल्यानंतर मित्र परिवाराने त्‍याचे जंगी स्‍वागत केले.

सायकलिंग हा मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा खेळ आहे. महाराजांचे आशीर्वाद, सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावरच संभाजीनगर ते महाड हे अंतर २१ तास ४० मिनिटात पूर्ण करू शकलो. - निरंजन यादव, सायकलस्‍वार शिवप्रेमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT