मुंबई

जनकल्याण रक्त केंद्राच्या वतीने शिबिर संयोजकांचा सन्मान

CD

महाड, ता. १८ (बातमीदार) : जनकल्याण रक्तकेंद्राचे वतीने २०२२-२३ मध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या संयोजकांचा नुकताच सन्मान करण्यात आला. संयोजकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमास दक्षिण रायगड व उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ११२ शिबिर संयोजक उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीचे जनसंपर्क व सीएसआर व्यवस्‍थापक कुलदीप पुरंदरे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रक्तकेंद्राचे अध्यक्ष धनंजय परांजपे, डॉ. माधव पवार, डॉ. राहुल सुकाळे, संजीव मेहता, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष अशोक तलाठी उपस्थित होते. रक्तदान शिबिर संयोजक आणि त्यांचे रक्तदान चळवळीतील योगदान याबाबत सादरीकरण सादर करण्यात आले.रक्‍तकेंद्राची वाटचाल, आपल्या भागातील रक्ताची गरज आणि रक्तसंकलन याबाबत नियोजन करण्यासंदर्भात रक्तकेंद्रातर्फे आवाहन करण्यात आले. रक्तदान शिबिरासंदर्भात प्रश्नमंजूषा आणि प्रश्नोत्तरे सत्रात संयोजकांनी सहभाग घेतला. पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी-भागाड, ड्यूफ्लोन इंडस्ट्रीज महाड, रा.स्व.संघ जनकल्याण समिती महाड, श्रीराम मंदिर ब्राह्मण सभा महाड, डॉ.ए.एन.साठे स्मृती समिती-दापोली, घरडा इंजिनिअरिंग कॉलेज-लवेल, दुर्गामाता प्रतिष्ठान-टेटवली, सद्गुरू बेटकर महाराज संस्था- लाडवली या संयोजकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव डाकवे यांनी तर सूत्रसंचालन सुधीर शेठ यांनी केले.

महाड ः रक्‍तकेंद्राच्या पदाधिकार्‌यांकडून संयोजकांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT