Robbery Sakal
मुंबई

Mumbai Crime : भरदिवसा बॅंकेतून दागिने लंपास, महिलेसह तिच्या मुलाला अटक

महाड शहरातील प्रभात कॉलनीमध्ये बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime - महाड शहरातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेमधील कर्मचाऱ्यांच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले दोन लाख ८७ हजारांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या बुरखाधारी महिलेसह तिच्या मुलाला अटक केली आहे. भरदिवसा बँकेत झालेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली होती.

महाड शहरातील प्रभात कॉलनीमध्ये बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेमधील कर्मचारी स्वरूप बालन (वय ३५) यांच्या ड्रॉव्हरमध्ये सोमनाथ शर्मा व मानसी गोठल यांनी बँकेत ठेवण्यासाठी दोन लाख ८७ हजार रुपयांचे दागिने दिले होते.

याचदरम्यान अडीच ते तीनच्या सुमारास बँकेत आलेल्या एका बुरखाधारी महिलेने हे दागिने घेऊन पोबारा केला आहे. शुक्रवारी (ता.३०) दुपारी हा प्रकार घडला असून याबाबत बँक कर्मचारी स्वरूप बालन यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या बुरखाधारी महिलेची ओळख पटवत प्रकरणात रफिका ढोकळे, साजिद ढोकळे, या मायलेकांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT