महाड शहर सावित्री व गांधारी नदीच्या संगमावर वसले आहे sakal
मुंबई

Raigad Rain Update: महाड तालुक्यात १९० मिमी, सावित्री, गांधारीने ओलांडली धोका पातळी

CD

महाड, ता. १९ (बातमीदार) : तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील काळ, गांधारी व सावित्री नदीला पूर आल्याने महाड व परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. महाड नगरपालिका व जिल्‍हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून बचाव पथक सज्ज आहे.

गेल्‍या२४ तासांत महाड तालुक्यात १९० मिलिमीटर तर पोलादपूर तालुक्यात २२३ किलोमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये पडणारे पाणी सावित्री नदीमार्गे महाडमध्ये येत असल्याने शहराला पुराचा फटका बसत आहे. रायगड भागातून येणारी काळ व गांधारी या नद्याही मंगळवारपासून दुथडी भरून वाहू लागल्याने महाड शहरांमध्ये बुधवारी सकाळपासून पुराचे पाणी शिरू लागले.


दस्तुरी नाका ते नातेखिंड हा रायगड किल्‍ल्‍याकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. भीमनगर, दस्तुरी नाका, गांधारी नाका या भागामध्ये गांधारी नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी आपले सामान हलवण्यास सुरुवात केली आहे. सावित्री नदीतील पाणी भोईघाटामार्गे महाड शहरात शिरू लागले आहे. सावित्रीची पातळी दुपारी दोन वाजेपर्यंत साडेसात मीटरपर्यंत गेल्याने शहरातील बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. महाड शहरातील सुकट गल्लीत आधी पाणी शिरल्‍यानंतर महात्मा गांधी मार्गावर, बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली.

२०२१ मध्ये पुराचे पाणी शिरल्याने महाडकारांचे अतोनात नुकसान झाले होते. आता पुन्हा शहरात पाणी शिरू लागल्याने महाडकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील डोंगरेपूल, भाजी मंडई परिसरात पाणी भरले आहे. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपले सामान सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच व्यापाऱ्यांची धावपळ सुरू होती.


नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी महाड नगरपालिकेकडून भोंगे वाजवून पाण्याच्या पातळीचा इशारा दिला जात होता. महाड नगरपालिकेकडून बचाव कार्य व बचाव गट स्थापन करण्यात आले असून त्यासंबंधीची माहिती व संबंधित अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक व्हाट्सअपद्वारे तसेच एसएमएसद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. आवश्यकता वाटल्यास सुरक्षित स्थळी नागरिकांचे स्थलांतर केले जाणार आहे.

गांधारी पूल, दस्तुरी नाका भागात पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अनेकांनी आपली वाहने गोवा महामार्गालगत उभी केल्‍याने सुमारे पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्‍या होत्‍या. पाणी साचलेल्या ठिकाणी, पुलावर फलक सूचना फलक लावून मार्ग बंद करण्यात आले आहेत. शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. आपत्‍कालीन परिस्‍थितीचा सामना करण्यासाठी महाडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT