मुंबई

गुरुजींना जिल्‍हा पुरस्काराचे वेध

CD

महाड, ता. २१ (बातमीदार) ः दरवर्षी पाच सप्टेंबरला जिल्ह्यातील शिक्षकांना जिल्हा पुरस्काराने सन्मानित केले जात असल्याने १५ तालुक्यातील गुरुजींना आता पुरस्काराचे वेध लागले आहेत. तालुकानिहाय शिक्षकांची निवड आता अंतिम टप्प्यात आहे.
पुरस्कारासाठी काही तालुक्यातून दोन तर काही तालुक्यातून तीन अशा २९ शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. यापैकी प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड केली जाणार आहे. दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने चांगले काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना हा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. संबंधित शिक्षकांनी भरून दिलेल्या माहितीची फेर पडताळणी करण्यात येते. या पुरस्कारासाठी शिक्षकांनी राबवलेले विविध उपक्रम, शैक्षणिक ब्लॉग, वेबसाइटची निर्मितीवर केलेले लिखाण, शैक्षणिक यु-ट्यूब चॅनलची निर्मिती, वेगवेगळ्या पातळीवर प्रकाशित शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सहल, इस्रो सहल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयोग, जिल्‍हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या वाढीसाठी केलेले प्रयोग यासह अन्य शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन करून योग्य शिक्षकांची निवड केली जाते.
पुरस्कारासाठी मागील आठवड्यात आलेल्या प्रस्तावांचे तालुकास्तरावर मूल्यांकन करून शिक्षकांची तालुकानिहाय माहिती आणि क्रॉस तपासणी पूर्ण झाली आहे. मूल्यांकन केलेले गुणांची गोपनीय माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी कोकणभवन येथे पाठवली आहे. लवकरच त्‍याची पडताळणी करून त्याआधारे १५ प्राथमिक शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.

प्रस्‍ताव कोकण भवनात सादर
जिल्‍हा पुरस्कारासाठी २९ शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवले आहेत. तालुकानिहाय अधिकाऱ्यांच्या समितीकडून प्राप्त प्रस्‍तावांची फेर पडताळणी करण्यात आली आहे. त्यानुसार गुणाकंन करून त्यांची गोपनीय माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी, शिक्षकांचे प्रस्ताव आणि मूल्यांकनाच्या गुण तालिका कोकण भवन येथे सादर केली आहे. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १५ शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT