मुंबई

महाडच्या कंपनीत भीषण स्फोट महाडच्या कंपनीत भीषण स्फोट

CD

महाड, ता. ३ (बातमीदार) ः महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ब्लू जेट हेल्थकेअर या कंपनीत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामध्ये कंपनीमध्ये काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी सात जण गंभीर जखमी झाले, तर ११ जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाड एमआयडीसीमधील अग्निशामक यंत्रणेच्या आवाक्याबाहेरील प्रकरण असल्यामुळे राज्य शासनाने या ११ जणांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला पाचारण केले.
महाड औद्योगिक वसाहतीमधील खासगी लिमिटेड या कंपनीमध्ये आज सकाळी दहा वाजण्याच्या भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीच्या प्लांटमध्ये असलेल्या एका रिएक्टर्सचा स्फोट झाला. यामुळे आग पसरत गेली आणि रिएक्टर्सचे एका मागून एक असे स्फोट होत राहिले. कामगार जिकडे वाट मिळेल तिकडे पळू लागले. शेजारी असलेल्या कंपन्यांतील कामगारांनीदेखील सुरक्षेच्या कारणामुळे कंपनी बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.
ब्ल्यू जेट कंपनी स्फोटात जमीन दोस्त झाली. लोखंडाचे खांब वितळून गेले. ढिगाऱ्‍याखाली ११ कामगार अडकले. ते दगावले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातील चार कामगार स्थानिक असून इतर कामगार परराज्यातील आहेत. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ११ कामगारांना काढणे शक्य होत नसल्याने मदत कार्यासाठी पुणे येथून एनडीआरएफला बोलावण्यात आले.
...
जखमी कामगार
स्वप्नील भामरे, विक्रम ढेरे, निमाची मुरमू, मयूर निंबाळकर, राहुल गिरमे, उत्तम विश्वास, ज्योतू पुरब
...
हे कामगार दगावल्याची भीती
जीवन कुमार चोबे, अभिमन्यू उंराव, विकास महातो, अक्षय सुतार, सोमीनाथ विधाते, विशाल कोळी, संजय पवार, असलम शेख, सतीश साळुंखे, आदित्य मोरे, शेषराव भुसारे हे कामगार दगावल्याची भीती व्यक्त होत आहे.
...
ब्ल्यू जेट कंपनीमधील ११ कामगारांचा शोध घेण्यात येत आहे. प्रशासनाकडून या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
- डॉ. ज्ञानोबा बानापुरे, प्रांताधिकारी, महाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cigarette Rate Hike: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा झटका! सिगारेट तब्बल 17% नी महागणार; एका पाकिटामागे किती शुल्क आकारणार?

Thane: ठाणेकरांवर पाणीटंचाईच्या झळा, दररोज ७५ टँकरचा पाणीपुरवठा, नागरिकांची मोठी कसरत

अफगाणिस्तानचा क्रिकेटर दिल्लीत देतोय मृत्यूशी झुंज; रक्ताची गरज असल्याने मागितलाय मदतीचा हात

Summer Kitchen Cooling Tips: उन्हाळ्यात किचनमध्ये गॅससमोर उभं राहणं कठीण होतंय? मग या ६ सोप्या टिप्स वापरा अन् किचनमध्ये लगेच मिळवा थंडावा

Latest Marathi News Live Update: जनतेकडून टीएमसी विरोधात मोठ्या संख्येने मतदान - अर्जुन सिंह

SCROLL FOR NEXT