Crime News sakal
मुंबई

Mumbai News: दोघांमधील वाद सोडवायला जाणे पडले महागात; हॉटेल आचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

या दोघांना हॉटेलचे आचारी बाळकृष्ण साळुंखे (वय ४०, राहणार तळिये) यांनी मज्जाव करण्याचा प्रयत्न केला | Hotel chef Balkrishna Salunkhe (age 40, living Taliye) tried to stop them both.

सकाळ वृत्तसेवा

Mahad News: हॉटेलमध्ये गोंधळ करणाऱ्या दोघांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आचाऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. महाड तालुक्यातील भावे गावच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.


भावे गावाच्या हद्दीत असलेल्या सुमय्या गार्डन बार अँड रेस्टॉरंटमध्ये रविवारी सायंकाळी जेवण करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांमध्ये वादावादीतून गडबड, गोंधळ सुरू होता. या दोघांना हॉटेलचे आचारी बाळकृष्ण साळुंखे (वय ४०, राहणार तळिये) यांनी मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने दोन्ही तरुणांनी साळुंखे यांच्यावरच धारदार शस्त्राने वार केले होते.

याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शुभम उर्फ राज तांबे आणि अमृत तांबे (दोघेही राहणार- भावे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भादंवि कलम ३०७, ३३६, ५०४, ५०६, ३४, तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१)(३)/१३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT