मुंबई

जितेंद्र आव्हाडांनी महाडमध्ये केले मनुस्मृतीचे दहन

CD

जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचे दहन
अनावधानाने फाडले डॉ. आंबेडकरांचा फोटो असलेले पत्रक

महाड, ता. २९ (बातमीदार) : मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला जात आहे. उद्या संपूर्ण मनुस्मृतीच अभ्यासक्रमात येईल, त्यामुळे या संविधानविरोधी कृत्याला वेळीच रोखले पाहिजे. ज्‍या भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचे दहन केले होते, त्याच भूमीतून आज पुन्हा त्याच मनुस्मृतीचे आपण दहन करून संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे दिली.
राज्य सरकारकडून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील काही श्लोकांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना दिली होती. यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेत बुधवारी (ता. २९) महाड येथे येत मनस्मृतीचे दहन केले. यापूर्वी त्यांनी आंबेडकरी चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दिवंगत सुरबानाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडून महाड शहराचे त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. यानंतर दुपारी १२ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यास त्याचप्रमाणे चवदार तळे येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून क्रांतिस्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी मिलिंद टिपणीस यांनी महाडचे ऐतिहासिक महत्त्व त्याचप्रमाणे मनुस्मृतीतील जाचक व मानवताविरोधी संकल्पनेचे विश्लेषण उपस्थितांसमोर मांडले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनीदेखील मनुस्मृतीतील काही श्लोकांचे वाचन करून त्यात महिलांविषयी तसेच इतर शूद्र समाजाविषयी लिहिलेल्या अमानवीय विचारांचे वर्णन उपस्थितांसमोर केले.

..
दिलगिरी व्यक्त
क्रांतिस्तंभ येथे मिलिंद टिपणीस यांचे भाषण चालू असताना मनुस्मृतीविरोधात घोषणा देताना जितेंद्र आव्हाड यांनी अतिउत्साहीपणा दाखवत मनुस्मृती निषेध व त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले पत्रकच फाडले; परंतु ही चूक त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नकळत झालेल्या या चुकीबद्दल उपस्थितांसमोर दिलगिरी व्यक्त केली आणि पत्रकारबांधवांनादेखील याची कल्पना दिली; परंतु या कृत्यावरून आंबेडकर अनुयायी प्रचंड नाराज असून सर्वत्र संताप व्यक्त केला आहे. त्यातच आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT