मुंबई

पालिकेकडून स्वयंसेवकांसाठी पोहणे व बचाव कार्याचे प्रशिक्षण, पूरस्थिती मध्ये होणार मदत

CD

पूरस्‍थितीत बचावासाठी स्‍वयंसेवक सज्‍ज
महाड नगरपालिकेकडून प्रशिक्षण
महाड, ता. १० (बातमीदार) ः शहराला दरवर्षी पुराचा मोठा तडाखा सहन करावा लागतो. शहरामध्ये पुराचे पाणी वाढू लागले की नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. अशावेळी नागरिकांना मदत कार्य करण्यासाठी शहरातील आपदामित्र व स्वयंसेवक पुढे येतात. मदतकार्यात हातभार लावणाऱ्या तरुणांना व स्वयंसेवकांना महाड नगरपालिकेकडून पोहणे व बचावकार्य संबंधातील प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणामुळे आपत्ती काळामध्ये मदत कार्यासाठी एक चांगली फळी उभी राहणार आहे.
महाड हे सावित्री व गांधारी नदीच्या किनाऱ्यावर वसले असून अतिवृष्‍टी झाल्‍यास नद्यांचे पाणी शहरात शिरते. नद्यांनी धोक्याची पातळीवर ओलांडली की शहराला पुराचा तडाखा बसतो. पुरामुळे नागरिकांचे व व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होते. अशा वेळी नागरिक व व्यापाऱ्यांना मदत करण्याकरता अनेक महाडकर, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक, आपदा मित्र पुढे सरसावतात. मदतकार्यासाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रशिक्षण असावे. तसेच याबाबत योग्य नियोजन व्हावे, यादृष्टीने महाड नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्वयंसेवकांना योग्य प्रशिक्षण दिले जात आहे.
शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांमधील तरुण तलावामध्ये पोहण्याचे तसेच ऐन पुरात मदतकार्य कसे करावे, नागरिकांना सुरक्षित कसे हलवावे व स्थलांतरित कसे करावे याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. यानंतर या सर्वांना होडी चालवण्याचे व होडीतून स्थलांतरित करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महाड नगरपालिकेच्या आपत्ती विभागाचे प्रमुख गणेश पाटील व त्यांचे सहकारी, तसेच इतर प्रशिक्षकांच्या माध्यमातून स्‍वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. ५ जूनपासून प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून नगरपालिकेने नोंदणी सुरू केली आहे. प्रशिक्षणासाठी अधिकाधिक स्वयंसेवकांनी पुढे यावे.
- धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी, महाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील पुर्णेकर कुटुंबियांच्या भेटीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दाखल

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT