मुंबई

नियोजनामुळे महाडकरांची पाणीटंचाईतून मुक्‍ती!

CD

महाड, ता. ३ (बातमीदार) : तीन वर्षांपासून महाडकरांना भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या नगरपालिकेने केलेल्या पूर्व नियोजनामुळे यंदा दूर झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. महाड शहरातील बहुतांशी भागांत कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा होतो. याशिवाय नगरपालिकेच्या कुर्ले धरणातून एमआयडीसी मधूनही काही भागांना पाणीपुरवठा केला जातो.
शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे धरणातून पाणीपुरवठा एप्रिलपासून कमी पडू लागतो. यानंतर धरणातील मृत साठ्यावर पाण्याची गरज भागवावी लागते. त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. तर काही गृहनिर्माण सोसायटी स्वखर्चाने पाण्याचा टँकर मागवतात. विंधन विहिरी व विहिरीतील पाणीही कमी होत जातो व नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.
काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता नगरपालिकेने यंदा पाण्याबाबत योग्य नियोजन केले. प्रथम एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. कोथुर्डे धरणातील पाणी बंद झाल्याने एमआयडीसीतील पाणी घेऊन हे पाणी शाळा क्रमांक पाच येथील टाकीत साठवले गेले. साठवण टाकीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील टाकीला जोडणारी जुनी मात्र वापरात नसलेली जलवाहिनी व विंधन विहिरी दुरुस्त व स्वच्छ करून एमआयडीसीकडून येणारे पाणी टाकीतून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कोथुर्डे धरणातून पाणीपुरवठा केला जाणाऱ्या जलवाहिनीला जोडण्यात आले व हे पाणी टंचाईग्रस्त भागाला देण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे शहरातील बहुसंख्या भागात एमआयडीसीचे पाणी पोहोचू शकले.

शहरात दरवर्षी भेडसावणारी पाणीटंचाईची झळ नागरिकांना फारशी जाणवली नाही. पाणी सोडण्याच्या वेळा प्रत्येक प्रभागानुसार निश्चित करण्यात आल्याने सर्व प्रभागांमध्ये योग्य रीतीने पाणी पोहोचू शकले. यामुळे टँकरद्वारे होणारा अतिरिक्त खर्च वाचण्यात पालिकेचा पाणीपुरवठा विभागाला यश आले.
- रोहित भोईर, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT