मुंबई

मद्य वाटपावरून मित्रांमध्ये हाणामारी

CD

महाड, ता.२ (बातमीदार): मद्य वाटपावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री महाडमध्ये घडला. या घटनेत एक जण गंभीर जखमी असून, महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रातील आसनपोई गावातील एका कारखान्यात काम करणारे बिरबल यादव, मिथिलेश सिंग (दोघेही राहणारे बिहार) आणि प्रसनजीत शांतिदास (रा. पश्चिम बंगाल) मद्य पिण्यासाठी एकत्र जमले होते. या वेळी प्रसनजीत आणि मिथिलेश यांच्यामध्ये मद्य वाटपावरून वादावादी झाली. काही वेळेतच दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. मिथिलेशने लोखंडी पाइपने प्रसनजीतला बेदम मारहाण केली. त्यात डोके आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. महाड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी त्याला मुंबई येथे पाठवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : परतीचा मान्सून बरसणार! पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा इशारा, आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Railway : हडपसर-हरंगूळ, नांदेड एक्स्प्रेसचे तीन डबे वाढणार

Beetroot Poriyal: खवलेले खोबरे अन् खमंग फोडणी; १० मिनिटांत बनवा दाक्षिणात्य पद्धतीची बीटरूट पोरियल! पाहा सोपी रेसिपी...

आजचे राशिभविष्य - 22 सप्टेंबर 2026

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT