मुंबई

स्मशानभूमीच्या भिंती बोलक्या

CD

सुनील पाटकर, महाड
जीवनातील अनेक रंग अनुभवल्यानंतर मानवाचा अंतिम प्रवास तिमिराकडे सुरू होतो, मात्र स्मशानभूमीतील वातावरण व तेथील गैरसोयी या ठिकाणी येणाऱ्या मृताच्या नातेवाईकांसाठी आणखीनच त्रासदायक ठरतात. महाड नगर परिषदेने स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील स्मशानभूमीची आकर्षक रंगरंगोटी करून वैकुंठधामाचे प्रवेशद्वार व भिंती बोलक्या केल्या आहेत. या ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक, स्वच्छता व पर्यावरणपूरक संदेश लिहिले आहेत.
शहरे, शाळा व परिसर स्वच्छ राहावा यासाठी कलेच्या माध्यमातून बागेच्या भिंती, शाळांच्या भिंती, संरक्षक भिंती यावर सुंदर चित्रे काढून भिंती बोलक्या केल्या जात आहेत. अंत्‍यसंस्‍कारासाठी येणारे दु:खी नातेवाईक व हितचिंतकांना या ठिकाणी अस्वच्छता वाटू नये, या करता बसण्यासाठी असलेल्या पायऱ्यांवर निरनिराळी सुभाषिते, जीवनाचे सार सांगणारे सुविचार, संतांची वचने, वारकरी संप्रदाय, देवदेवतांची चित्रे, यांसह दोन्ही प्रवेश कमानीसह संपूर्ण स्मशानभूमीची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. सुभाषितांमुळे भिंती बोलक्या झाल्या असून येणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा तसेच स्वच्छता व पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
सातारा येथील चित्रकार मोहन जगताप यांनी स्‍मशानभूमीच्या भिंती बोलक्‍या केल्‍या आहेत. जगताप यांना अनेक शाळा,अंगणवाड्या चित्र काढून सुशोभित केलेल्या आहेत. महाबळेश्वर येथे त्यांनी काढलेले गव्याचे चित्र येथे येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. चित्रांतून कचरा कुंडीत टाकण्याचे आवाहन व पर्यावरण रक्षण यावर भर दिला आहे. अशाच सुंदर चित्रांनी व सुभाषितांनी भिंती सुशोभित झाल्‍या असून या स्तुत्य उपक्रमाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

एकदाचं ठरलं! पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती १२ मार्चला तर १८ मार्चला ठरणार झेडपीचे अध्यक्ष; हात उंचावून सदस्य करणार मतदान, वाचा...

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT