मुंबई

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

CD

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
महाड, ता. ७ (बातमीदार) : लग्न ठरलेल्या मुलीची अन्य चार जणांच्या सहकार्याने सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी एका तरुणासह एकूण पाच जणांवर महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवाब नवाज करबेलकर याचे महाड तालुक्यातील एका मुलीसोबत लग्न ठरले होते; परंतु नवाबचे दुसऱ्या मुलींसोबत प्रेमसंबंध असल्याचे या नवरी मुलीला समजल्यानंतर नवाबने या मुलीला हे लग्न मोडण्यासाठी सांगितले. मुलीने हे लग्न मोडल्यानंतर नवाबने सोशल मीडियावर एका दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने बनावट अकाउंट उघडून आपल्या अन्य चार साथीदारांच्या मदतीने २० सप्टेंबर ते २३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत मुलीच्या चारित्र्याविषयी बदनामी सुरू केली. तसेच, फेक अकाउंटधारकासोबत मुलीचे खोटे संभाषण तयार करून त्याचे स्क्रीनशॉट काढून ते मित्रांच्या मोबाईलवर पाठवून मुलीची बदनामी केली. याबाबतची माहिती पीडितेने महाड शहर पोलिस ठाण्यात धाव घेत गुरुवारी (ता. ५) नवाबसह या अन्य चार आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नवाब नवाज करबेलकर याच्यासह नवाज जमीरुद्दीन करबेलकर, आजिमा नवाज करबेलकर, नरिमा नवाज करबेलकर, नमरीन नवाज करबेलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT