महाडमध्ये घरकुलचे २,५०७ लाभार्थी
रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
महाड, ता. १० (बातमीदार) : प्रधानमंत्री आवास व इतर घरकुल लाभार्थींच्या घरांचे भूमिपूजन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. महाड तालुक्यातील तब्बल अडीच हजार लाभार्थींना योजनेतून लाभ दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला महाडच्या गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील, माजी सरपंच संदीप झांजे व इतर ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच उपस्थित होते.
सर्वांसाठी घरे हे केंद्र सरकारचे महत्त्वाचे धोरण असून महाड तालुका पंचायत समिती कार्यालयाकडून याबाबत कार्यवाही सुरू आहे. या अंतर्गत सर्व केंद्र पुरस्कृत घरकुल योजनांचे उद्दिष्टानुसार शंभर टक्के मंजुरी देणे, सुरू न झालेल्या घरकुलाचे काम करणे, अपूर्ण घरकुले पूर्ण करणे या संदर्भातील मोहीम हाती घेण्यात आली आहे. महाड तालुक्यातील सर्व केंद्र व राज्य घरकुल योजनांमधील २,५०७ घरांचे भूमिपूजन करण्यात आला. आकले ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत २,४०७ रमाई आवास योजनेंतर्गत १३, शबरी आवास योजनेंतर्गत ४, पीएम मोदी आवास योजनेअंतर्गत १६०, पीएम जनमत आवास योजनेंतर्गत २३ घरकुलांचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला. आकले ग्रामपंचायतीत प्रदीप खोपकर यांच्या घराचे भूमिपूजन प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.
महाड ः घरकुल योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.
.............
घरकुलांसह काजू लागवडीची पाहणी
म्हसळा. ता. ९ (बातमीदार) ः मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत म्हसळा तालुक्यात लाभार्थ्यांच्या घरकुलांची आणि काजू लागवडीची तहसीलदार सचिन खाडे यांनी पाहणी करून मार्गदर्शन केले. रेवली येथील घनदाट जंगलात जाऊन काजू लागवडी केलेल्या बागायतदारांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या.
काजू लागवड आणि त्यांचे संगोपन कसे करायचे, कोणत्या हंगामात कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर करायचा याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्या समवेत कृषी अधिकारी सुजय कुसाळकर, पोलिस पाटील अनंत पाटील, अनिल टिंगरे, विठोबा धोंडू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. त्याची अंमलबजावणी तालुक्यात शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन खाडे यांनी केले.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.