मुंबई

‘आपला दवाखाना’ डॉक्‍टरच्या प्रतीक्षेत

CD

महाड, ता. ९ (बातमीदार) : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली ‘आपला दवाखाना’ योजनेला महाडमध्ये ग्रहण लागले आहे. शहरातील आपला दवाखान्यात डॉक्टर नसल्याने आरोग्यसेवा पूर्णपणे ठप्प आहे.
‘आपला दवाखाना’ ही महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्यसेवा योजना आहे. योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे, मोफत रक्त व आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात निदान सेवा असे फायदे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झाली. त्यानुसार महाड शहरात बाजारपेठेतील जुन्या भाजी मंडई भागामध्ये महाड नगरपालिकेच्या व्यावसायिक गाळ्यात ‘आपला दवाखाना’ मे २०२३मध्ये सुरू करण्यात आला. सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असल्याने वैद्यकीय सेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता व रुग्णदेखील दवाखान्याचा लाभ घेत होते; परंतु दवाखाना सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच आपला दवाखान्यासाठी डॉक्टर न मिळाल्याने हा दवाखाना आता केवळ शोभेची वास्तू उरला आहे.
दवाखान्यामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, तर वीजसेवेचादेखील अभाव आहे. सद्यस्थितीत याठिकाणी काम करणारे दोन कर्मचारी दररोज दवाखाना सुरू करतात; मात्र डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्यसेवक नसल्याने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सेवा मिळू शकत नाही. त्यामुळे महाड शहरातील गरीब व गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.
आपला दवाखान्यामध्ये रक्तचाचणीदेखील मोफत होत असल्याने रुग्णांना याचा फायदा व्हायचा; परंतु डॉक्टरही नाही आणि पिण्याचे पाणीही नाही त्यामुळे रक्तचाचणीदेखील या ठिकाणी आता बंद झाली आहे. आपला दवाखाना योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश महाराष्ट्राच्या जनतेला मूलभूत वैद्यकीय सुविधा मोफत देणे हा होता; परंतु हा दवाखाना बंद झाल्याने योजनेच्या उद्देशालाही धक्का पोहोचला आहे. अनेक महिन्यांपासून या ठिकाणची वैद्यकीय सेवा ठप्प झाल्याने आता आपला दवाखाना बंद होण्याच्या स्थितीत आहे.

महाड शहरात आपला दवाखान्यासाठी डॉक्टर उपलब्ध नाही. नवीन पदभरती न झाल्याने डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तरीदेखील डॉक्टर मिळावा, यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे.
- डॉ. नितीन बावडेकर, आरोग्य अधिकारी, महाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Case : चेतनच्या कृत्यामुळे कुटुंब धास्तावले; फ्लॅटला कुलूप लावून रातोरात झाले पसार!

US-Iran Conflict: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! इराणविरोधातील लष्करी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमध्ये मंजूर

Jamun Sharbat: पावसाळ्यातला थकवा दूर करतं जांभळाचं हे खास सरबत; एकदा प्याल तर पुन्हा पुन्हा मागाल

Baramati AI Farming: बारामतीचा आवाज थेट संयुक्त राष्ट्रांपर्यंत! शेतकऱ्यांसाठी विकसित ‘एआय’ संशोधनाची रोममधील जागतिक परिषदेसाठी निवड

Monsoon Rain Alert Maharashtra : मॉन्सूनचे ढग आणखी दाटले, मुंबई, गोवा, किनारपट्टीवर पावसाची शक्यता; ७ राज्यात पावसाने जोर धरला

SCROLL FOR NEXT