मुंबई

रायगडावरील धनगर समाजाच्या पाठीशी राष्ट्रवादी शरद पवार गट, सक्षणा सलगर यांनी घेतली धनगर समाजाची भेट

CD

धनगर समाजाच्या पाठीशी राष्ट्रवादी शरद पवार गट
रायगडावर पुरातत्त्वच्या नोटिशीनंतर सक्षणा सलगर यांनी घेतली भेट

महाड, ता. १६ (बातमीदार) : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर परंपरागत राहत असलेल्या धनगर समाजाच्या वस्तीला केंद्रीय पुरातत्त्व विभागाने अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत नुकत्याच गड सोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. याचा सर्व स्तरावरून निषेध होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्ष सक्षणा सलगर यांनी रविवारी (ता. १५) किल्ले रायगडावर दाखल होत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून गडावरील धनगर समाजाच्या व्यथा जाणून घेतल्या.
गडउतार होताच सलगर यांनी महाड शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. सक्षणा सलगर यांनी सरकारवर निशाणा साधताना फक्त किल्ले रायगडावरील अतिक्रमण दिसते का, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या पत्नी कुमुदिनी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
धनगर समाज हा पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने गडावर वास्तव्यास असून येणाऱ्या पर्यटकांना व्यवसायाच्या माध्यमातून चहा, नाश्ता, भोजन, शीतपेय व अन्य प्रकारची सेवा उपलब्ध करून देत आहेत. त्याचबरोबर गडस्वच्छता, गडसेवादेखील करीत आहेत. आम्हाला सरकारचा बंगला नको, जागा नको, आम्हाला रायगडावरच्या मातीवरच राहायचे आहे, अशी धनगर समाजाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किल्ले रायगडावरील धनगर समाजासाठी सर्व स्तरावरून पाठिंबा मिळताना दिसत असून आता पुरातत्त्व विभागाने बजावलेल्या नोटिशीबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय भूमिका घेते, यावर सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

महाड ः गडावरील धनगर समाजाची सक्षणा सलगर, रवींद्र चव्हाण यांनी भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Fifa World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला, Mumbai Indians कडूनही जोरदार सेलिब्रेशन; दोघांचं नेमकं काय कनेक्शन?

RTI Andolan: अण्णा हजारे आक्रमक! आरटीआय कायद्याविरोधात पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा; राळेगणसिद्धीत चर्चा निष्फळ

रोमान्स, हॉरर आणि भावनांचा संगम; सई मांजरेकरच्या 'इकाई'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT