मुंबई

वरंध घाटमार्गातील वाहतूक बंद

CD

महाड, ता. १८ (बातमीदार) : पावसाळ्यात प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता, महाड-पुणेदरम्‍यानचा वरंध घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे जिल्हा हद्दीत सुरू असलेले रुंदीकरणाचे काम तसेच या मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्गावरील वाहतूक तीन महिने बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे महाड-पुणे हा रस्ता महाड हद्दीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.
महाड-वरंध घाटमार्ग असणारा हा रस्ता पुणे व पंढरपूर येथे जाण्यासाठी सोयीचा आहे. महाडमार्गे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा जुना रस्ता असल्याने या मार्गावरून दररोज दूध, भाजी, धान्य वाहतूक तसेच महाड औद्योगिक क्षेत्रातदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या रस्त्याचे रुंदीकरण दोन वर्षांपासून सुरू आहे. महाड हद्दीतील काम पूर्ण झाले असून पुणे जिल्ह्यातील रस्त्याचे काम सुरू आहे.
दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून हा मार्ग धोकादायक होतो. याआधीही अनेकदा घाटातील रस्ता खचून व वाहून गेल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. सध्या रस्त्याची सुरू असलेली कामे व पावसाळी धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी १ जून ते ३१ सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व प्रकारच्या अवजड, मध्यम वाहनांच्या वाहतुकीसाठी वरंध घाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसाळ्यात हवामान खात्याने रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिला नसल्यास काही काळासाठी घाटमार्ग हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला ठेवणे योग्य राहील, असेदेखील परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग खुले
बंदी कालावधीत रस्त्यावरून जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग म्हणून पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव, निजामपूर ताम्हिणी घाटमार्गे पुणे तर कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा पोलादपूर, महाबळेश्वर- वाई- सातारामार्गे कोल्हापूर अथवा राजेवाडी फाटा, पोलादपूर, खेड, चिपळूण पाटणमार्गे कोल्हापूर अशा पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.
....
फोटो - वरंध घाट मार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

Video Viral: रनआऊट होताच रागात बॅट फेकली अन् आपल्याच टीममेटवरही भडकला, पाकिस्तानी खेळाडूचा उद्दामपणा

बापरे! जयंतचे डोळे जाणार? जान्हवीच्या मदतीला 'तो' येणार... लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...'असला फालतूपणा'

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT