मुंबई

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

CD

धोकादायक ३८९ इमारतींना नोटिसा
रहिवाशांना स्‍थलांतराच्या सूचना‍; काहींना संरचनात्‍मक अहवाल सादर करण्याच्या सूचना

महाड, ता. २ (बातमीदार) : पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील १६ नगरपालिका व नगर पंचायतींच्या हद्दीमध्ये असणाऱ्या ३८९ धोकादायक इमारतींना नगरपालिका प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींची संख्या कमी असली तरी त्‍या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. त्‍यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी त्वरित स्थलांतरित व्हावे, तर अन्य इमारतींनी संरचनात्‍मक अहवाल त्‍वरित सादर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
महाड शहरातील काजळपुरा भागातील तारीक गार्डन ही इमारत २४ ऑगस्ट २०२० ला कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये १६ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते, तर सहा जण जखमी झाले होते. यामुळे ५६ कोटींची वित्तहानी झाली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. यानंतर सरकारला जाग आली आणि राज्यातील धोकादायक इमारतींचा संरचनात्‍मक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्‍या. त्‍यानुसार दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडून धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते व धोकादायक स्थितीत आढळलेल्या इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरित होण्याबाबत निर्देश दिले जातात. शिवाय ज्या इमारतींची दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या इमारतींची दुरुस्ती करून नगरपालिकेला याबाबत कळविले जाते. गतवर्षी जिल्ह्यात ४९९ इमारती धोकादायक आढळल्या होत्या, परंतु यंदा ही संख्या घटली असून, ३८९ इमारती धोकादायक आढळल्या आहेत.

दर्जेदार बांधकामांचा अभाव
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणानंतर जिल्‍ह्यातील शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायही तेजीत असून, अनेक ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या राहात आहेत. इमारतीचे काम लवकर पूर्ण करणे, जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी कमी दर्जाचे साहित्य वापरणे आदींमुळे इमारती धोकादायक बनत आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी केवळ १५ ते २० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींची दयनीय अवस्था झाली आहे. महाड शहरातील अनेक पूरग्रस्त भागामध्ये आजही सात मजली इमारतींना परवानगी दिली जात असल्याने इमारतींचा धोका आणखीनच वाढला आहे.

पनवेल, खोपोलीमध्ये सर्वाधिक धोकादायक इमारती
जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील ३८९ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पनवेल व खोपोलीमध्ये दीडशे इमारती धोकादायक आहेत. पनवेल, मुंबईजवळ असल्याने इमारतींची संख्या मोठी असून, उरणमध्ये धोकादायक इमारतीची संख्या ५१ आहे.

सरकारी इमारतींचाही समावेश
रायगड जिल्ह्यामध्ये अनेक सरकारी इमारती धोकादायक आहेत. रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत, मांडवी येथील अलिबाग उत्‍पादन शुल्‍क विभाग, टपाल विभागाची कर्मचारी वसाहत, अलिबाग नगर परिषद हद्दीतील सरकारी कर्मचारी वसाहत, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती, जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत धोकादायक आहेत. महाडमधील नगर परिषद शाळा क्रमांक एक, तसेच शाहू महाराज सभागृह इमारत, खोपोलीतील शिळफाटा येथील भाजी मार्केट, नगर परिषदेची इमारत तसेच व्यायामशाळा, श्रीवर्धनमधील जुने तहसील इमारत, पोलादपूरमधील पोलिस वसाहत, माथेरानमधील रेल्वे विभागाची जुनी कॅन्टीन व रूम असलेली इमारत, टपाल विभाग, विश्रामगृह, याशिवाय माथेरानमधील अनेक जुने बंगले, मुरूड-जंजिरा येथील उत्‍पादन शुल्‍कच्या इमारतींचा धोकादायक यादीत समावेश आहे.

दुरुस्‍ती न केल्‍यास हातोडा
नगरपालिकांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये, ज्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत, त्या इमारतींना महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या इमारतींमधील रहिवाशांनी तातडीने बांधकामाचा संरचनात्‍मक अहवाल सादर करावा, आवश्यकता वाटल्यास तातडीने दुरुस्ती करावी, ज्या इमारतींची दुरुस्ती शक्य नाही, त्‍या पाडण्याचे आदेशदेखील पालिका देणार आहे. शिवाय रहिवाशांना तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचनाही दिल्‍या आहेत.

इमारतींची स्‍थिती
धोकादायक - ३०२
अतिधोकादायक- ५८
सरकारी धोकादायक -२२
सरकारी अतिधोकादायक - ७

महाड शहरातील धोकादायक इमारतींची स्थळ पाहणी केली असून, तातडीने संरचनात्‍मक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यात धोकादायक आढळणाऱ्या इमारती रिकाम्‍या केल्‍या जाणार आहेत.
- धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी, महाड नगर परिषद


महाड ः शहरातील राजर्षी शाहू महाराज सभागृहाची दुरवस्‍था झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT