मुंबई

पनवेल-चिपळूण मेमू धावणार

CD

पनवेल-चिपळूण मेमू धावणार
दिवाळीसाठी कोकण रेल्वेची विशेष सुविधा
महाड, ता. ४ (बातमीदार) : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दोन विशेष गाड्यांबरोबर आठवड्यातील तीन दिवस पनवेल-चिपळूण मेमू धावणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आता दिवाळी सुट्टीसाठी कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे.
सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने सोमवारी सायंकाळी दोन दिवाळी स्पेशल गाड्या जाहीर केल्या. मडगाव-एलटीटी साप्ताहिक स्पेशलसह चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू स्पेशलचा समावेश आहे. साप्ताहिक स्पेशलचे आरक्षण १ ऑक्टोबरपासून खुले झाले आहे. कोकण तसेच गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांना य सुविधेचा फायदा होणार आहे. मडगाव १००८०/२००८० क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक दिवाळी स्पेशल ५,१२,१९ ऑक्टोबरदरम्यान दर रविवारी धावणार आहे. मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ६,१३,२० ऑक्टोबरला दर सोमवारी धावेल. एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या स्पेशलला २० एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत.
करमाळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
.....
प्रवाशांसाठी अनारक्षित सेवा
दीपावली सुट्टीसाठी ०११६०/०११५९ क्रमांकाची चिपळूण पनवेल अनारक्षित मेमू स्पेशलही चालवण्यात येणार आहे. ३ ते २६ ऑक्टोबरपर्यंत दर शुक्रवार, शनिवार, रविवारी चालवण्यात येणार आहे. चिपळूण येथून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ही मेमू सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी ४.१० वाजता पनवेल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात पनवेल येथून सायंकाळी ४:४० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता चिपळूणला पोहोचेल. या गाडीला आंजणी, खेड, कळंबनी बुद्रुक, दिवाणखवटी, बिन्हेरे, करंजाडी, सापेवामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासु पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे स्थानकात थांबे देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT