दुचाकी-रिक्षा अपघातामध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू
महाड, ता. १ (बातमीदार) : महाड वाळण रस्त्यावर दहिवड गावाजवळ आज सकाळी दुचाकी व रिक्षामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. अमोल महामूनकर (वय १०) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दहिवड गावातील दीपेश भिकेश कालगुडे (वय २०) हा आपल्या स्कुटीवर महामूनकरला शाळेत सोडण्यासाठी जात असताना महाडकडून दहिवडकडे येणाऱ्या रिक्षाशी समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, अमोल महामूनकर जागीच ठार झाला, तर दीपेश कालगुडे गंभीर जखमी झाला. त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. रिक्षाचालकाचे नाव गुलाम हुसेन उमर संगमेश्वरी (वय ७२) असे असून, या अपघाताबाबत महाड औद्योगिक वसाहतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी गुन्हा दाखल केला आहे.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.