मुंबई

जलप्रबोधन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

जलप्रबोधन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाड, ता. १६ (बातमीदार): प्रचंड पाऊस पडूनही उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासत असलेल्या कोकणात भूप्रकृतीनुसार जलसंधारण करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर मार्गदर्शन करणाऱ्या एकदिवसीय जलप्रबोधन कार्यशाळेला महाड तालुक्यातील नाते येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोकणातील जलदूतांसाठी आयोजित कार्यशाळेत शास्त्रीय जल नियोजनावर भर देण्यात आला.
ही कार्यशाळा रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट आणि राजेंद्र सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या गांधारी नदी संवर्धन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामुळे नाते विभागातील ४१ गावांना वर्षभर नळपाणी उपलब्ध झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात वाडी-वस्तीवरील पाणीटंचाई दूर करणे तसेच शेतीपूरक व्यवसायांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
रोटरीच्या जलसंधारण सेलचे संचालक व अभिनव जलनायक या पुस्तकाचे लेखक सतीश खाडे यांनी गवताचे जलसंधारणातील तसेच पूर व दरड नियंत्रणातील महत्त्व विविध यशस्वी उदाहरणांसह स्पष्ट केले. सावित्री नदी प्रहरी गणेश खातू यांनी शिवकालीन जलनीतीनुसार झरे विकास व जलस्रोत बळकटीकरण कोकणातील उन्हाळी पाणीटंचाईवर प्रभावी उपाय ठरू शकतो, असे मत मांडले.
या वेळी रोटरी क्लब ऑफ महाडचे अध्यक्ष सुधीर मांडवकर, नाते ग्रामपंचायतीचे उपसरपंच समीर पाथरे, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टचे सचिव चेतन पालांडे, प्रदीप शेठ, संतोष नगरकर, प्राइड इंडियाचे रुपेश धामणस्कर तसेच एम. एम. जगताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजय धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT