मुंबई

सव येथील गरम पाण्याच्या कुंडाचा होणार विकास

CD

सव येथील गरम पाण्याच्या कुंडाचा होणार विकास
मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते रस्‍त्‍याचे उद्‌घाटन; पर्यटनाला नवी दिशा
महाड, ता. १ (बातमीदार) ः महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नैसर्गिक गरम पाण्याचे झरे व कुंड प्रसिद्ध असून, त्यापैकीच एक वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेले महाड तालुक्यातील सव येथील गरम पाण्याचे कुंड आता विकासाच्या मार्गावर येणार आहे. या कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. या रस्त्यामुळे या दुर्गम पण नैसर्गिक संपत्तीने समृद्ध पर्यटनस्थळाला नवी ओळख मिळणार असून, परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यात महाडजवळ सावित्री नदीच्या काठावर वसलेले हे नैसर्गिक उष्ण पाण्याचे कुंड गंधकयुक्त आणि औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. त्वचारोग व सांधेदुखीसाठी उपयुक्त मानले जाणारे हे पाणी असल्याने दूरदूरहून पर्यटक येथे स्नानासाठी येत असतात. मात्र, आजवर या कुंडाकडे जाण्यासाठी ठोस रस्ता नसल्याने पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या कुंडाकडे जाण्यासाठी सुसज्ज रस्ता उभारण्यात येणार असून, त्यामुळे पर्यटकांसाठी सुरक्षित व सोयीस्कर मार्ग उपलब्ध होईल. यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल, स्थानिकांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील, तसेच या परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास होईल, असे मत मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी व्यक्त केले. या भूमिपूजन समारंभाला स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सव येथील गरम पाण्याचे कुंड भविष्यात रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन आकर्षण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
..........
सुविधेअभावी दुर्लक्षित
सध्या या ठिकाणी पोहोचण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून सावित्री नदीतून होडीने प्रवास करावा लागतो किंवा महाड-म्हाप्रळ मार्गावरून सव गावातून पायवाटेने, शेतातील बांधांवरून ये-जा करावी लागते. रस्त्याच्या अभावामुळे हे निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ पुरेशा सुविधा नसल्याने दुर्लक्षित राहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT