मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सावित्री–जिजाऊ उत्सव

CD

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सावित्री-जिजाऊ उत्सव
स्त्री शिक्षणातूनच समाजपरिवर्तन : गीतांजली साळवी
महाड, ता. ५ (बातमीदार) : महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही सावित्री-जिजाऊ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून ३ ते १२ जानेवारी या कालावधीत विविध शैक्षणिक व वैचारिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून गीतांजली साळवी उपस्थित होत्या. आपल्या प्रभावी व्याख्यानात त्यांनी समाज परिवर्तनासाठी स्त्री शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे ठाम मत मांडले. तत्कालीन समाजातील स्त्री-पुरुष विषमता, अन्यायकारक रूढी, जाचक परंपरा यांचे सखोल विश्लेषण करत सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यामुळे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात घडून आलेल्या परिवर्तनाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश बोराळे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्त्री शिक्षणाचे महत्त्व व आधुनिक समाजनिर्मितीतील त्याची भूमिका अधोरेखित केली. या कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
उत्सवाचा उद्देश
महाविद्यालयात दरवर्षी ३ ते १२ जानेवारीदरम्यान साजऱ्या होणाऱ्या सावित्री-जिजाऊ उत्सवाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्त्री शिक्षण, स्त्री सक्षमीकरण व सामाजिक समतेचे विचार रुजवणे हा आहे. या कालावधीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित केली जातात. सोमवारी (ता. १२) राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त उत्सवाची सांगता होते.
. ........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाने 62 जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT