मुंबई

विकास गोगावले यांना अटक होत नसल्याने न्यायालयाने पोलिसांना धरले धारेवर

CD

विकास गोगावले यांना का अटक नाही?
प्रतिज्ञापत्र सादर करा; न्यायालयाने पोलिसांना खडसावले
महाड, ता. २१ (बातमीदार) : महाड नगर परिषद निवडणूक मतदानादरम्यान शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि पुतण्या महेश गोगावले यांना अद्याप अटक न झाल्याने न्यायालयाने रायगड पोलिसांना धारेवर धरले. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत. विकास गोगावले यांचा जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्जदेखील दाखल झाल्याने पोलिस आता याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता २ डिसेंबरला मतदान सुरू असताना मतदान केंद्राबाहेर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. गाड्या फोडण्यात आल्या होत्या. या वेळी विकास गोगावले व सुशांत जांबरे यांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केल्यानंतर विकास गोगावले, महेश गोगावले, सुशांत जांबरे यांच्यासह सुमारे दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पाच जणांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. तरी विकास गोगावले व महेश गोगावले यांना दीड महिन्यांपासून अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. महेश गोगावले व विकास गोगावले यांचा जामीन अर्ज २३ डिसेंबरला यापूर्वीच फेटाळला गेला होता. तरीही त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाची गंभीर दखलदेखील न्यायालयाने घेतली आहे. याबाबत न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठासमोर झालेल्या सुनावणीत विकास गोगावले व महेश गोगावले यांना अटक न झाल्याबाबत न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महत्त्वाची लढाई
शिवसेना शिंदे गटातर्फे २० जानेवारीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये नडगावतर्फे बिरवाडी या मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी विकास गोगावले यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. विकास गोगावले यांच्यासाठी ही महत्त्वाची लढाई असल्याने त्यांच्या अटक व जामिनाबाबत पुढे कोणती कार्यवाही होते, याकडे राजकीय पक्ष व मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रियांका चोप्राने मुलीच्या जन्मासाठी सरोगसी करायचं का ठरवलं? ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत म्हणाली- माझं बाळ हे...

Petrol Storage: भारतात पेट्रोलचा साठा कसा आणि कुठे केला जातो? जाणून घ्या भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची संपूर्ण माहिती

Latest Marathi News Live Update : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा; महापौर पदावरून वाद चिघळला

Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viral

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

SCROLL FOR NEXT