मुंबई

महाड तालुक्यात अनेक ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती, तालुक्यामध्ये प्रचाराचा धुरळा

CD

महाडमध्ये निवडणूक प्रचाराचा धुरळा
पाच गट आणि १० गणांत दुरंगी-तिरंगी लढतींचे चित्र
महाड, ता. २९ (बातमीदार) : महाड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी युती विरुद्ध शिंदे गट, ठाकरे गट आणि काँग्रेस अशी दुरंगी व तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे, तर तालुक्यात प्रचारालादेखील आता वेग आला आहे.
महाड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे १० गण आहेत. यापूर्वी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे, परंतु या वेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गट विरुद्ध युती केल्याने तसेच ठाकरे गट स्वतंत्रपणे रिंगणात उतरल्याने तालुक्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये बहुसंख्य ठिकाणी थेट लढती होत आहेत त्यामुळे मत विभागणी व मत परिवर्तित होणे असे प्रकार कमी घडणार आहेत.
बिरवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या मंदा ढेबे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पल्लवी बागडे आणि ठाकरे गटाच्या दिपाली मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे, तर खरवलीमध्ये शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यांच्या पत्नी मनाली काळीजकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकिता सुतार निवडणूक रिंगणात आहेत. दासगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे मन्सूर ताज यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी घरटकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याशिवाय बिरवाडी पंचायत समिती गण, वरंध गण, खरवली गण, नडगावतर्फे बिरवाडी गण, करंजाडी आणि दासगाव गण या ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. विन्हेरे गण, नाते गण व अप्पर तुडील गण येथे तिरंगी लढती होणार आहेत.

एक बिनविरोध
महाड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे १० गण आहेत. यातील धामणे गणामध्ये शिवसेनेचे अनिल जाधव बिनविरोध निवडून आल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह बळावला आहे.

प्रतिष्ठेची लढाई
नडगावतर्फे बिरवाडी गटातून शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून नीलेश महाडिक निवडणूक लढवत आहेत. करंजाडी मतदार संघातून शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य नीलेश ताठरे, तर ठाकरे गटाकडून सोमनाथ ओझरडे, भाजपकडून माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य अमित मोरे आणि काँग्रेस पक्षाकडून उमेश तांबे निवडणूक रिंगणात आहेत.

कायद्याचा कचाटा सुटला
महाडमध्ये नगरपालिका निवडणूक राड्याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात अडकलेले उमेदवार व पदाधिकारी यांना आता जामीन मिळाल्याने ते प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आता प्रचाराचा चांगला धुरळा उडाला आहे.

.......
फोटो - शिवसैनिकांची बैठक घेताना मंत्री भरत गोगावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT