मुंबई

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाडमधील सहा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

CD

महाडमध्ये सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
माजी मंत्र्यांच्या मुलाचाही समावेश
महाड, ता. १४ (बातमीदार) : महाड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार आवश्यक मते मिळवण्यात अपयशी ठरल्याने सहा उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली आहे. यामध्ये माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे चिरंजीव अमित मोरे यांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांपैकी १/६ म्हणजे १६.६७% पेक्षा कमी मते मिळाल्यास अनामत रक्कम म्हणजेच (डिपॉझिट) जप्त होते. जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण उमेदवाराला एक हजार रुपये तर राखीव उमेदवारांसाठी ५०० रुपये आणि पंचायत समितीसाठी सर्व साधारण उमेदवाराला ७०० रुपये व राखीव उमेदवाराला ३५० रुपये एवढी रक्कम अनामत रक्कम म्हणून ठेवली जाते. महाड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सहा जणांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. करंजाडी गटात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली होती. येथून माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे सुपुत्र अमित मोरे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. या गटात केवळ ७०० मते मिळवित अमित मोरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. याच या गटातून अनामत रक्कम जप्त झालेले दुसरे उमेदवार उमेश तांबे यांना केवळ १११ मते मिळाली. त्यांनी मुदतीत आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने ते उमेदवार म्हणून रिंगणात राहिले. मात्र त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सोमनाथ ओझर्डे यांना पाठिंबा देत आपल्याला मतदान न करण्याचे आवाहन केले होते.

‘या’ सहा उमेदवारांची रक्कम जप्त
बिरवाडी जिल्हा परिषद गटातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार दीपाली मोरे यांच्यासह तीन जिल्हा परिषद उमेदवारांचा समावेश आहे. अप्पर तुडील पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार नाझनीन अफजलखान देशमुख आणि नाते पंचायत समिती गणातील ठाकरे गटाचे उमेदवार कपिल देवळेकर व अपक्ष उमेदवार सुरेश रघुनाथ महाडिक यांचीही अनामत रक्कम जप्त झाली आहे.


उमेदवार, निवडणूक स्तर, पक्ष प्राप्त मते
अमित प्रभाकर मोरे, जिल्हा परिषद, भाजप (करंजाडी) ७००
दीपाली मोरे जिल्हा परिषद ठाकरे (बिरवाडी) ९७६
उमेश तांबे जिल्हा परिषद काँग्रेस (करंजाडी) १११
कपिल देवळेकर पंचायत समिती ठाकरे (नाते) ६८२
नाझनीन देशमुख पंचायत समिती काँग्रेस (अप्पर तुडील) २००
सुरेश महाडिक पंचायत समिती अपक्ष (नाते) १९०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: विजय आपलाच, पण त्याच्यापासून सावध राहा..., हरभजन सिंगचा भारतीय संघाला इशारा

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : IND vs PAK सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीम सरावासाठी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर दाखल

SCROLL FOR NEXT