मुंबई

कीर्तनासाठी ‘छत्रपतींची’ प्रतीकात्मक उपस्थिती

CD

कीर्तनासाठी छत्रपतींची प्रतीकात्मक उपस्थिती
महाडच्या श्री वीरेश्वर मंदिरातील अनोखी परंपरा
छबिना उत्सवात शेकडो वर्षांपासून जपली जातेय शिवस्मरणाची भावपूर्ण परंपरा
महाड, ता. १९ (बातमीदार) : महाड येथील श्री वीरेश्वर मंदिरातील छबिना उत्सवात कीर्तनासाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित राहतात, अशी भाविकांची श्रद्धा असून या अनोख्या परंपरेचे दर्शन दरवर्षी घडते. सभागृहात शिवरायांचा पुतळा गादीवर स्थानापन्न करून त्यांच्या साक्षीने कीर्तन पार पडते. त्यामुळे भाविकांमध्ये भक्तिमय आणि इतिहासस्मरणाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो.
१३ फेब्रुवारीपासून सुरू झालेला छबिना उत्सव १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू असून फाल्गुन शुद्ध द्वितीयेला भरणारी जत्रा हा या उत्सवाचा मुख्य दिवस मानला जातो. शिवकालीन वारसा लाभलेल्या श्री वीरेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवराय या मंदिरात दर्शनासाठी येत असत, अशी परंपरागत समजूत असल्याने त्यांच्या स्मरणार्थ ही परंपरा जपली जात आहे.
उत्सवादरम्यान पाच दिवस कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. यंदा गुहागर येथील डॉ. जोगळेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. कीर्तन सुरू असताना छत्रपतींचा पुतळा, शेजारी ठेवलेली गादी व लोड यामुळे शिवराय स्वतः कीर्तन श्रवण करत असल्याचा भास निर्माण होतो. पूर्वजांकडून पुढे आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जोपासली जात आहे.


शिवस्मरणातून इतिहासाशी जुळते भाविकांचे नाते
या परंपरेमुळे उत्सवाला केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक अधिष्ठान लाभते. छत्रपतींच्या स्मरणातून नव्या पिढीपर्यंत स्वराज्याचा वारसा पोहोचवण्याचे काम या उपक्रमातून होत असून भाविकांमध्ये अभिमान आणि भक्तिभाव अधिक दृढ होत आहे.
..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT