मुंबई

चवदार तळ्याला येणार झळाळी सुशोभीकरणासाठी 55 कोटी रुपयांचा निधी

CD

चवदार तळ्याला येणार झळाळी
सुशोभीकरणासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी
महाड, ता. २१( बातमीदार) : ऐतिहासिक चवदार तळे व परिसरातील सुशोभीकरणासाठी सामाजिक न्याय विभागाने ५५ कोटी ८० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे चवदार तळ्याला आता नवी झळाळी येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य आणि चवदार तळे सत्याग्रहाचा आगामी शतक महोत्सव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाड येथील चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेविरोधात लढा देत २० मार्च १९२७ ला सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली. महानगरपालिकेकडून यापूर्वी १९८९ मध्ये चवदार तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. परंतु, यानंतर चवदार तळ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी विशेष तरतूद नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. परंतु, आता बाबासाहेब यांच्या १२५ व्या जयंती व चवदार तळे सत्याग्रहाचा शतक महोत्सव यांचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाने सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चवदार तळे येथे दरवर्षी लाखो अनुयायी चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महापरिनिर्वाण दिन यानिमित्ताने भेट देत असतात. याशिवाय या ठिकाणी हजारो पर्यटक व शालेय सहली देखील येत असतात. या पार्श्वभूमीवर निधीमुळे तळ्याचे सुशोभीकरण होऊन नवी झळाळी प्राप्त होणार आहे.

१४ तळे व परिसराचे सुशोभीकरण
तळ्याच्या सुशोभीकरण व परिसरातील विकास कामांसाठी ५५ कोटी ७९ लाख ८५ हजार ६५३ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीमधून करण्यात येणारी कामे महाड नगर परिषदेचे मार्फत केली जाणार आहे. १४ तळे व परिसराचे सुशोभीकरण, संरक्षक भिंत, तळ्यातील पाण्याचे जलशुद्धीकरण आणि इतर कामे यातून केली जाणार आहेत.

सामाजिक न्याय विभागाने यापूर्वी सात कोटी रुपयांचा निधी चवदार तळे परिसराच्या विविध कामांसाठी मंजूर केलेला होता. आता सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी विशेष बाब म्हणून हा ५५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे.
- भरत गोगावले, रोजगार हमी योजना मंत्री

फोटो - चवदार तळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT