मुंबई

चवदार तळे सौंदर्यकरणाचे काम आता नगरपालिका ऐवजी एमआयडीसी कडे

CD

चवदार तळे सौंदर्यीकरणाचे काम
आता नगर परिषदेऐवजी एमआयडीसीकडे
महाड, ता. ११ (बातमीदार) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीवर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून महाड येथील चवदार तळे सुशोभीकरणाच्या कामासाठी सुमारे ५६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली होती. या निधीतील सर्व कामे महाड नगर परिषदेने करावी, असा निर्णय झाला होता; परंतु चवदार तळे सौंदर्यीकरणाचे काम महाड नगर परिषदेऐवजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाड शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केलेले चवदार तळे असून या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी सामाजिक न्याय विभागाने १८ फेब्रुवारी २०२६ला शासन निर्णय पारित करून या निर्णयाद्वारे चवदार तळे सौंदर्यीकरण व परिसर विकासासाठी ५५ कोटी ७९ लाख ८५ हजार ६५३ रुपये निधीला मान्यता दिली होती. याच शासन निर्णयामध्ये चवदार तळे सौंदर्यीकरणाची कामे करणारी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाड नगर परिषदेचा उल्लेख करण्यात आल्यामुळे ही कामे पहिल्या शासन निर्णयानुसार महाड नगर परिषदेमार्फत केली जाणार होती; परंतु आता या निर्णयात बदल करून ही कामे एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आली आहेत.
ऐतिहासिक चवदार तळे हे महाड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असून त्यावर पूर्णपणे नगर परिषदेचा हक्क आहे. तसेच, चवदार तळ्याबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्याचा सामना नगर परिषदेला करावा लागतो. यापूर्वी येथे झालेली अनेक कामे नगर परिषदेमार्फत करण्यात आलेली असतानादेखील चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम एमआयडीसीला देण्यात आल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शुद्धिपत्रक जारी
महाड नगर परिषदेच्या प्रशासकीय काळामध्ये गांधारी नदीच्या पुलाचे काम आणि वीरेश्वर तलाव सौंदर्यीकरण व इतर कामे रखडल्याने व या कामाच्या दर्जेदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने चवदार तळ्याचे काम एमआयडीसीकडे वर्ग केले जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नगर परिषदेला काम न देता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचादेखील विचार न करता हे काम थेट एमआयडीसीला देण्यात आलेले आहे. सामाजिक न्याय विभागाने ६ मार्चला याबाबत शुद्धिपत्रक जारी केले आहे. या शुद्धिपत्रकात एमआयडीसीला काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT