मुंबई

महाडच्या तनय लाडला जलतरणात सलग दोन सुवर्णपदके

CD

महाडच्या तनय लाडला जलतरणात सलग दोन सुवर्णपदके
महाड, ता. ३० (बातमीदार) : थायलंडमधील क्रॅबी येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक दर्जाच्या ''ओशनमॅन क्रॅबी २०२६'' या खुल्या जलतरण स्पर्धेत महाड जिल्ह्यातील १३ वर्षीय उदयोन्मुख जलतरणपटू तनय तुषार लाड याने अभूतपूर्व कामगिरी करत २ सुवर्ण आणि १ कांस्य अशी एकूण ३ पदके पटकावून तिरंगा अभिमानाने फडकावला.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तनयने ५०० मीटर (ओशनकिड्स) १५ वर्ष वयोगटात अवघ्या ६ मिनिटे ५७ सेकंदात अंतर पार करून सुवर्ण पदकावर नाव कोरले. २ किमी (स्प्रिंट) या श्रेणीतही त्याने आपले वर्चस्व टिकवून ठेवत दुसरे सुवर्णपदक मिळवले.
सलग दोन सुवर्णपदके जिंकल्यानंतर ५ किमी ''हाफ ओशनमॅन'' शर्यतीत १९ वर्ष वयोगटात   त्याने सहभाग घेतला. अत्यंत आव्हानात्मक लाटांवर मात करत त्याने या श्रेणीत कांस्यपदक जिंकले. एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन पदके जिंकणारा तो या स्पर्धेतील सर्वात लहान यशस्वी भारतीय खेळाडू ठरला आहे.
तनय हा महाड येथील रहिवासी असून न्यू होरायझन्स पब्लिक स्कूल, पनवेल येथील ८ वीचा विद्यार्थी आहे. त्याला पलावा येथील ''रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमी'' (ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर) येथे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
.

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Punjab Mail : ११४ वर्षांची परंपरा जपत ‘पंजाब मेल’ नव्या रूपात रुळांवर

SCROLL FOR NEXT